उदगिरात सहा दिवसाचे मृत अर्भक सापडल्याने खळबळ

प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र

उदगीर(जि. लातूर) : शहरातील अण्णाभाऊ साठे चौक जवळ असलेल्या मुक्कावार मैदानात रवीवारी (ता.18) रोजी पुरुष जातीचे अंदाजे सहा दिवसांचे मृत अर्भक सापडल्याने खळबळ उडाली आहे. हे अर्भक ताब्यात घेऊन त्याची उत्तरीय तपासणी करून या घटनेचा शोध घेण्याचे काम ग्रामीण पोलिसांच्या वतीने सुरू आहे.


याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की रविवारी (ता. 18) रोजी या मैदानात मृतावस्थेतील अर्भक नागरिकांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी तात्काळ संबंधित ग्रामीण पोलिसांना कळवले. ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत ह्या प्रकाराची माहिती घेतली व ते अर्भक येथील सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल केले.


एकंदरीत या परिस्थितीच्या संदर्भामध्ये हे अर्भक खड्डा करून पुरले असावे, खड्डा लहान असल्याने कुत्र्यांनी या अर्भकास त्या जागेपासून आठ फुटापर्यंत ओढत नेले आहे. या अर्भकाच्या नाळे जवळ दवाखान्यातील चिमठा, हाताला सलाईन लावलेली पांढरी पट्टी आढळून आल्याचेही पोलिसांनी सांगितले.


या अर्भकाची उत्तरीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर काय प्रकार आहे हे लक्षात येणार असून यातील आरोपी त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले. पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जी. टी. गायके जमादार श्री गीते व तुळशीराम बरुरे अधिक तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com