esakal | सहा महिण्यानंतर राज्यातील ग्रंथालये वाचकांसाठी उघडली
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

कोरोना या महाभयंकर रोगाने महाराष्र्टासह इतर राज्यातही थैमान घातले होते.त्यामुळे राज्य शासनाने राज्यातील नागरिकांच्या होणार्‍या गर्दीचे ठिकाणे बंद करण्याचा निर्णय घेतला होता.त्यामूळे सार्वजनिक ग्रंथालयेही गेल्या ( ता.२२) मार्च—२०२० महिण्यापासून बंद करण्यात अाली होती

सहा महिण्यानंतर राज्यातील ग्रंथालये वाचकांसाठी उघडली

sakal_logo
By
विलास शिंदे

सेलू ( जिल्हा परभणी ) - राज्यात अालेल्या 'कोरोना'च्या भयंकर रोगापासून नागरिकांचा बचाव होण्यासाठी राज्यातील सार्वजनिक ग्रंथालये ( ता.२२ ) मार्च—२०२० या महिण्यापासून बंद करण्यात अाली होती.तब्बल सहा महिण्यानंतर ( ता.१५) अाॅक्टोंबर —२०२० पासून राज्यातील ग्रंथालये नियम व अटीनूसार सुरु करण्याचा ग्रंथालय संचालनालय,महाराष्र्ट राज्य मुंबई यांनी निर्णय घेतला.

कोरोना या महाभयंकर रोगाने महाराष्र्टासह इतर राज्यातही थैमान घातले होते.त्यामुळे राज्य शासनाने राज्यातील नागरिकांच्या होणार्‍या गर्दीचे ठिकाणे बंद करण्याचा निर्णय घेतला होता.त्यामूळे सार्वजनिक ग्रंथालयेही गेल्या ( ता.२२) मार्च—२०२० महिण्यापासून बंद करण्यात अाली होती.अखेर ( ता.१५ ) पासून ग्रंथालयांना पूढील प्रमाणे अटीनूसार उघडण्याची परवागी देण्यात अाली अाहे.०१) प्रतिबंधित क्षेत्रात ग्रंथालयीन सेवा पूर्णत:बंद राहिल.०२) ग्रंथालयाची वेळ शक्यतो सकाळी अाठ ते सांयकाळी पाच या दरम्यान ठेवावी.०३) ग्रंथालयाचे प्रवेशद्वार व इतर सेवा सुरू असलेल्या विभागात सॅनिटायझरचीश व्यवस्था करावी.०४) ग्रंथालयातील कर्मचार्‍यांना थर्मल स्कॅनर/ इन्फारेड थर्मामीटर / अाॅक्सीमीटर प्रशिक्षण देणे अावश्यक राहिल.ग्रंथालयात येणार्‍या प्रत्येक वाचकाचे तापमान घेऊन त्याची स्वतंत्र नोंदवहित दिनांक,अ.क.,वाचकाचे / सभासदाचे नाव,येण्याची वेळ,भ्रमणध्वनी क्रमांक,तापमान,अाॅक्सीजन लेवल व स्वाक्षरी इ.अशा नमुन्यात घ्यावी.सदर नोंदवहिस कोरोना- १९ नोंदवही असे नाव द्यावे,सदर नोंदवही ग्रंथालयात ठेवणे अावश्यक राहिल.०५) ग्रंथालयाच्या दोन कर्मचार्‍यांमध्ये / वाचकांमध्ये किमान एक मिटर अंतर अासावे.०६) ग्रंथालयात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीने सदैव मास्क वापरणे अनिवार्य राहिल.त्याशिवाय ग्रंथालयात प्रवेश देवू नये.०७) ग्रंथालयात साबण,पाणी व हॅण्ड सॅनिटायझरची व्यवस्था करावी.०८) सर्व व्यवस्थापन मंडळातील पदाधिकारी व ग्रंथालयातील कर्मचार्‍यांनी अापले हात साबणाने किमान २० सेकंद स्वच्छ धुवावेत.०९)वारंवार वापरण्यात येणार्‍या वस्तूंचे सोडीयम हायपोक्लोराईड सोल्युशनने दिवसातुन तीन वेळा स्वच्छ पुसून घ्यावेत.१०)  ग्रंथालयातील सर्व वस्तूंचे निर्जंतुकिकरण सॅनिटायझरने करण्यात यावे.या प्रमाणे एकूण अठरा अटींचे पालन करण्यास ग्रंथालयांना प्रतिबंधित करण्यात आहे.

हेही वाचा राज्याच्या इतिहासात आजवर घडले नाही असे राज्यपालांचे वर्तन- विजय वडेट्टीवार -

प्रतिक्रिया

राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयाच्या सेवा सुरु झाल्यामुळे 'कोरोना'चा प्रादुर्भाव वाढल्यास नजीकच्या शासकीय यंणेत्रस व संबधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास ग्रंथालय व्यवस्थापनाने विनाविलंब अवगत करणे बंधनकरक अाहे.त्याबाबत स्थानिक शासकिय यंत्रणेकडून प्रात निर्देशानूसार/ शासनाच्या मार्गदर्शक तत्वानूसार त्या कालावधीसाठी  ग्रंथालय सेवा स्थगित ठेवण्यात यावी.

- शालिनी गो.इंगोले, प्रभारी ग्रंथालय संचालक, मुंबई

गेल्या सहा महिण्यापासून राज्यातील सार्वजनिक ग्रंथालये "कोरोना" या रोगामुळे बंद होती.त्यामुळे शासनाकडून ग्रंथालयाचे शासकिय अनूदान ग्रंथालयांना वेळेवर मिळाले नाही.पर्यायाने राज्यातील कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ अाली.अाता शासनाने ग्रंथालये सुरू केली.त्यामुळे ग्रंथालयांना तत्काळ अनूदानही देण्याची व्यवस्था करावी.जेणे करून कर्मचार्‍यांच्या पगाराचा प्रश्न निकाली निघेल.

- डाॅ.रामेश्वर पवार, अध्यक्ष, राज्य ग्रंथालय संघ, मुंबई

संपादन - प्रल्हाद कांबळे