Marathwada Biodiversity: मराठवाड्यात आढळल्या सहा नव्या वनस्पतींच्या प्रजाती; जैवविविधतेचे नवे पैलू समोर, दोन अभ्यासकांचे संशोधन
Plant Discovery : लातूर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध वनस्पतींच्या संशोधनात सहा नवीन प्रजातींचा शोध लागला आहे. या संशोधनामुळे मराठवाड्यातील जैवविविधतेचे नवे पैलू समोर आले आहेत.
लातूर : जिल्ह्यातील रेणापूर येथील वनस्पती अभ्यासक शिवशंकर चापुले आणि छत्रपती संभाजीनगर येथील मिलिंद गिरधारी यांच्या संशोधन अभ्यासात मराठवाड्यात (न्यू टू मराठवाडा)सहा नवीन वनस्पतींच्या प्रजाती आढळून आल्या आहेत.