पदवीधर निवडणुकीसाठी सहा हजार आठशे मतदार करणार चौदा केंद्रांवर मतदान

युवराज धोतरे
Wednesday, 4 November 2020

उदगीर विधानसभा मतदारसंघाअंतर्गत असलेल्या उदगीर व जळकोट तालुक्यातील एकूण सहा हजार आठशे नऊ पदवीधर मतदार मतदान करणार आहेत.

उदगीर (जि.लातूर) : उदगीर विधानसभा मतदारसंघाअंतर्गत असलेल्या उदगीर व जळकोट तालुक्यातील एकूण सहा हजार आठशे नऊ पदवीधर मतदार मतदान करणार आहेत. त्यासाठी उदगीर तालुक्यात एकूण बारा, तर जळकोट तालुक्यात एकूण दोन असे चौदा मतदान केंद्र निश्चित केले असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी दिली आहे.

ओबीसी-मराठा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, मराठा महासंघाचा इशारा

उदगीर शहरातील गटसाधन केंद्र ७४१, जिल्हा परिषद शाळेची मुख्य इमारत २०९, लालबहादूर शास्त्री विद्यालय १०८०, शिवाजी महाविद्यालय पूर्व बाजू ८६८, पश्चिम बाजू ६२४, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोघा २३०, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेर ३३४, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडार ३१८, जिल्हा परिषद प्रशाला देवर्जन २९९, जिल्हा परिषद प्रशाला वाढवणा ३४१, जिल्हा परिषद प्रशाला नळगीर ३६२, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागलगाव ३५७ असे उदगीर शहर व तालुक्यातील केंद्रनिहाय मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात चार हजार चारशे अठ्ठावीस पुरुष मतदार तर बाराशे पंच्याहत्तर महिला मतदारांचा समावेश असल्याचे श्री.मेंगशेट्टी यानी सांगितले.

अमिताभ बच्चन, सोनी वाहिनीवर गुन्हा दाखल करा; आमदार अभिमन्यू पवार यांची तक्रार

जळकोट तालुक्यात जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पूर्व बाजू सातशे तर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा घोनसी येथे ४०६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या दोन केंद्रावर एकूण ९३९ पुरुष पदवीधर तर १६७ महिला पदवीधर मतदार असे एकूण अकराशे सहा मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदान केंद्राचा पाहणी दौरा करून हे केंद्र निश्चित करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी मेंगशेट्टी यांनी दिली आहे. उदगीर उपविभागाअंतर्गत उदगीर व जळकोट तालुक्यात औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये व सर्व मतदान केंद्रावर आवश्यक त्या सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. या मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या कर्मचाऱ्‍यांच्या नियुक्त्या व त्यांच्या प्रशिक्षणाची तयारी पूर्ण झाली असल्याचेही श्री मेंगशेट्टी यानी सांगितले.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six Thousand Of Voters Cast Their Vote For Graduate Constituency Election