बीड जिल्ह्यात कोरोनाचा सहावा बळी, १०९ रुग्ण उपचारानंतर बरे

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 30 June 2020

तरुणाचा अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. जिल्ह्यात झालेला हा तिसरा मृत्यू आहे. तिघांचे मृत्यू जिल्ह्याबाहेर उपचार घेताना झाले आहेत. दरम्यान, सद्यस्थितीत कोरोनाग्रस्तांची संख्या १२५ झाली आहे.

बीड - कोरोना विषाणूच्या संसर्गाने मंगळवारी (ता. ३०) एका २८ वर्षीय तरुणाचा अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. जिल्ह्यात झालेला हा तिसरा मृत्यू आहे. तिघांचे मृत्यू जिल्ह्याबाहेर उपचार घेताना झाले आहेत. दरम्यान, सद्यस्थितीत कोरोनाग्रस्तांची संख्या १२५ झाली आहे.

गिरवली (ता. भूम, जि. उस्मानाबाद) येथील तरुणाला उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. शुक्रवारी (ता. २६) त्याला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्याचा मंगळवारी (ता. ३०) उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, जिल्ह्यातील हा सहावा मृत्यू आहे. 
दरम्यान, नगर जिल्ह्यातील कुटूंब नातेवाईकांकडे आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे आले होते. यातील सात जणांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे समोर आले.

हेही वाचा - बीड क्राईम - जेवण, दारूस नकार, तलवार कत्तीने हल्ला

१७ मे रोजी यातील वृद्धेचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर मातावळी (ता. आष्टी) येथील ३५ वर्षीय मुंबईहून परतलेल्या तरुणाच्या मृत्यूनंतर त्याचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यानंतर जिल्ह्यात झालेला हा तिसरा मृत्यू आहे. तर, केज तालुक्यातील माळेगाव व परळी शहरातील महिलेचा औरंगाबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू झाले. तर, गहुखेल (ता. आष्टी) येथील १५ वर्षीय मुलाचा पुणे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत १२५ कोरोनाग्रस्त आढळले असून यातील १०९ उपचारानंतर बरे झाले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sixth victim of corona in Beed district, 109 patients recovered after treatment