लहान शहरांतील कार मार्केट बदलतेय : मायकल जोप 

लहान शहरांतील कार मार्केट बदलतेय : मायकल जोप 

औरंगाबाद : भारतातील मोठ्या शहरांच्या रस्त्यांवर धावणाऱ्या मर्सिडीज कार आता लहान शहरांमध्येही दिसतात आणि त्यामुळे येथील बाजारपेठ बदलत आहे. भारतातील लहान शहरांत पैसा येत आहे आणि तेथे ग्राहकांची पसंती लक्‍झरी कारला असल्याचे मर्सिडीज बेन्झ इंडियाचे उपाध्यक्ष (सेल्स ऍण्ड मार्केटिंग) मायकल जोप यांनी सांगितले.

भारतातील लहान शहरांमध्ये श्रीमंती वाढत आहे. येथे राहणाऱ्या लोकांच्या गरजा, मागण्या आणि प्राथमिकता बदलत आहेत. त्यामुळे मर्सिडीज बेन्झ इंडियाचा आता लहान शहरांमध्ये आपली बाजारपेठ तयार करण्याकडे कल आहे. सध्या मर्सिडीज 45 शहरांमध्ये 94 ठिकाणी काम करीत आहे. 'गो टू कस्टमर' धोरण कंपनीने आवलंबल्याने आता यापुढे अशा लहान शहरांचा शोध कंपनी कायम ठेवेल. ज्यांच्याकडे औरंगाबादसारखी वाढ दिसत आहे, अशा टू आणि थ्री टियर शहरांमध्ये आपला विस्तार कायमच राहणार असल्याची माहिती जोप यांनी पत्रकारांना दिली.

औरंगाबादेत निर्मिती विस्तार नाही औरंगाबादेतून जगभरात ऑटो पार्टची निर्यात होत असली तरी चाकणला कारखाना असल्याने औरंगाबादेत कंपनी कोणताही निर्मितीमधील विस्तार करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या देशात राज्य आणि केंद्र सरकारतर्फे तयार करण्यात आलेल्या इलेक्‍ट्रॉनिक व्हेइकल पॉलिसीबाबत बोलण्यास मात्र जोप यांनी नकार दिला. औरंगाबादेत 'मर्सिडीज-बेन्झ'च्या इंडिश्‍च मोटर्सच्या उद्‌घाटनानिमित्त ते औरंगाबादेत आले होते. या वेळी संचालक ओम मोहरीर यांची उपस्थिती होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com