घरासमाेर खेळणाऱ्या चिमुकल्याचा सर्पदंशाने मृत्यू

Aurangabad Gramin News
Aurangabad Gramin News

पाचोड (जि.औरंगाबाद) ः घरासमोर खेळणाऱ्या तीन वर्षीय बालकाचा विषारी सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता.19) थेरगाव (ता.पैठण) येथे घडली. येथील आठवड्यातील ही तिसरी घटना असल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दिगंबर बापुराव काळे यांचा तीन वर्षीय मुलगा स्वराज हा मंगळवारी (ता.19) दुपारी घरासमोर वर्दळीच्या रस्त्यावर खेळत होता. तोच विषारी सापाने त्याच्या उजव्या पायास चावा घेतला. चावा घेतल्यानंतर मुलगा स्वराज मोठ्याने रडू लागला.

त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून घरात काम करणारे आजोबा, आजी, आई-वडील व शेजारी धावत आले. स्वराजच्या पायाला झालेली गंभीर जखम पाहून त्यास दगड लागला असावा असा अंदाज वर्तवून सुरवातीला फारसे कुणी गांभीर्याने घेतले नाही. मात्र काही वेळातच स्वराज बेशुद्ध अवस्थे होत असल्याचे पाहुन त्यास पाचोड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला औरंगाबादला उपचारासाठी हलविण्याचा डॉक्‍टरांनी सल्ला दिला. अन्‌ त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

त्यानंतर त्याच्या तोंडाला आलेला फेस व निळी-काळी झालेली जखम पाहून विषारी साप चावला असावा असा अंदाज वर्तवून घराच्या सभोवतालची चाचपणी करण्यात आली. त्यावेळी बालकाला दंश झालेल्या ठिकाणी सापाच्या दोन कातीन आढळून आल्याने सर्पदंशाचा अंदाज व्यक्त करण्यात आला. शोकाकुल वातावरणात सायंकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. स्वराज त्याच्या आई-वडिलास एकुलता एक मुलगा होता. या आठवड्यातच येथे दोन शाळकरी मुलांचा शेततळ्याच्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाला होता. ते दोघेही या स्वराजच्या शेजारीच राहत होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com