शिक्षकांच्या या अधिवेशनाला येणार इतके मंत्री

File Photo
File Photo

नांदेड : महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक महासंघाच्या वतीने नांदेड येथे २४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान शिक्षण परिषद, राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा आणि राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजन समितीचे दिनकर हनमंते यांनी दिली.

हॉटेल ताज पाटील येथे (ता.२२) झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. तीन दिवशीय अधिवेशनाबद्दल माहिती देताना श्री हनमंते म्हणाले, लेबर कॉलनी येथील शुभारंभ मंगल कार्यालयात हे अधिवेशन घेण्यात येणार असून, सोमवारी (ता.२४) रोजी सकाळी ११ वाजता पहिल्या दिवशी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्‍घाटन करण्यात येणार आहे. या वेळी बहुजन शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष दिनकर हनमंते, तर स्वागताध्यक्ष म्हणून बहुजन शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शंकर कांबळे यांची उपस्थिती राहणार आहे.

महत्वपूर्ण विषयावर होणार चर्चा​
या वेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, शालेय मंत्री वर्षा गायकवाड, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, सामाजिक न्याय तथा समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे, पर्यावरण पाणीपुरवठा मंत्री संजय बनसोडे, हिंगोली जिल्ह्याचे खासदार हेमंत पाटील, आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, यांच्यासह जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, उपाध्यक्ष पद्मा सतपलवार यांची उपस्थिती राहणार आहे.

याविषयावर होणार व्याख्यान
शिक्षण परिषदेच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता.२५) शिक्षण परिषद व सावित्रीबाई फुले आदर्श शाळा जिल्हा पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. या पुरस्कारास प्रमुख वक्ते म्हणून माजी शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे यांचे ‘शाळा आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता निर्माणात शिक्षक, पालक व प्रशासनाची भूमिका’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. यावेळी कार्यक्रमाचे उद्‍घाटक म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते उद्‍घाटन होणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, सुधीर ठोंबरे, प्राचार्य डॉ. जयश्री आठवले, शिक्षणाधिकारी बाळासाहेब कुंडगीर, प्रवीण पाईकराव, चंद्रकांत धुमाळ हे उपस्थित राहणार आहेत. शेवटच्या दिवशी बुधवारी (ता.२६) शंकर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली खुले अधिवेशन होणार असून, यात अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com