'शिवकन्या' करतेय समाजप्रबोधन

संदीप लांडगे
शनिवार, 12 जानेवारी 2019

"वक्तृत्वकलेत तेजस्विनी सावंत हिने आगळावेगळा ठसा उमटविला आहे. शिवाय खेळाचीही तिला विशेष आवड आहे. शिवकन्या, शिवव्याख्याती अशी बिरुदे तिला विविध संघटनांनी बहाल केली आहेत.'' 

औरंगाबाद : औरंगाबादेतील शारदा मंदिर शाळेत इयत्ता नववीत शिकणारी तेजस्विनी हिने आतापर्यंत राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले या राष्ट्रनेत्यांविषयी जिल्ह्यासह जालना, बीड, नांदेड, परभणी येथे हजारो श्रोत्यांसमोर 70 पेक्षा जास्त व्याख्याने सादर केली आहेत. या कर्तृत्वामुळे तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत; तसेच "शिवकन्या' "शिवव्याख्याती' अशी बिरुदे तिला विविध संघटनांनी बहाल केली आहेत. दुष्काळ, शेतकरी आत्महत्या वाचवा, सध्याचे सामाजिक प्रश्‍न व युवा परिवर्तनावरही तिने समाजप्रबोधन केले आहे. 

वक्तृत्व कलेसह खेळातही तेजस्विनीने नाव कमावले आहे. टेनिस, व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियातर्फे राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धेतही तिने पारितोषिक पटकावले आहे. तिने आतापर्यंत शिवचरित्र, जिजाऊ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, फुले-शाहू यांच्यावरही विविध अंकांत लेखन केले आहे. 

Web Title: social awaking by shivakanya Tejaswini Sawant