esakal | Diwali 2020 : सामाजिक न्यायमंत्र्यांची दिवाळी व्यापाऱ्यांसोबत, धनंजय मुंडे यांनी दुकानांना भेटी देत दिल्या शुभेच्छा
sakal

बोलून बातमी शोधा

Dhananjay Munde

राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी लक्ष्मी पूजनानिमित्त शहरातील व्यापारी बांधवांना त्यांच्या दुकानांवर जाऊन शुभेच्छा देत व्यापाऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली आहे.

Diwali 2020 : सामाजिक न्यायमंत्र्यांची दिवाळी व्यापाऱ्यांसोबत, धनंजय मुंडे यांनी दुकानांना भेटी देत दिल्या शुभेच्छा

sakal_logo
By
प्रवीण फुटके

परळी वैजनाथ  (जि.बीड) : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी लक्ष्मी पूजनानिमित्त शहरातील व्यापारी बांधवांना त्यांच्या दुकानांवर जाऊन शुभेच्छा देत व्यापाऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली आहे. राज्याचे मंत्रीच दुकानात शुभेच्छा देण्यासाठी आल्याने व्यापारी बांधवांमध्ये नवचैतन्य व उत्साह दिसून आला.
सामाजिक न्याय मंत्री मुंडे हे शहरातील मुख्य बाजारपेठेत सर्व व्यावसायिकांना दुकानात जाऊन लक्ष्मीपूजनानिमित्त शुभेच्छा देत असतात. या वर्षी कोरोना विषयक नियमांची खबरदारी घेत त्यांनी ही परंपरा कायम राखली.

अखेर ॲसिड, पेट्रोल टाकून जाळलेल्या प्रेयसीचा मृत्यू; निर्दयी प्रियकराला नांदेड जिल्ह्यात बेड्या

शनिवारी (ता.१४) लक्ष्मीपूजनाच्या सायंकाळी मंत्री मुंडे यांनी व्यापारी बांधवांना त्यांच्या दुकानावर जाऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी धनंजय मुंडे यांच्यासमवेत युवक नेते अजय मुंडे, अभय मुंडे, वाल्मिक कराड, अँड. गोविंद फड, बाजीराव धर्माधिकारी, प्रा. मधुकर आघाव, दीपक देशमुख, चंदूलाल बियाणी, माणिकभाऊ फड, सूर्यभान मुंडे, राजाभाऊ पौळ, सुरेश टाक, वैजनाथ सोळंके, विनोद जगतकर, सय्यद सिराज, संजय फड, दीपक तांदळे यांसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. लक्ष्मी पूजनानिमित्त धनंजय मुंडे यांनी बाजारपेठेतील कृषी सेवा केंद्र, किराणा मालाचे दुकान, सुवर्णकार, कापड दुकाने, आडत दुकाने अशा अनेकविध व्यावसायिकांच्या लक्ष्मीपूजनामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला.व दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. रात्री उशिरापर्यंत व्यापारी बांधवांच्या भेटी गाठी सुरू होत्या. तत्पूर्वी त्यांनी आपल्या निवासस्थानी लक्ष्मीपूजन केले.

संपादन - गणेश पिटेकर