सोशल मीडियावर जातीवाचक मजकूर प्रसारित करणाऱ्यांचा जामिन फेटाळला

सुषेन जाधव
शनिवार, 7 जुलै 2018

पुरोहित संघटनेचे अध्यक्ष सुभाष शंकर मुळे दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित सचिन म्हस्के (रा. चटेरी, जि. परभणी) व राजरतन सोनार (रा. कोधरी कोठरी, जि. परभणी) यांनी 18 जून 2018 रोजी यु-ट्यूबवर एका समाजाच्या भावना दुखावणारे गाणे अपलोड केले होते.

औरंगाबाद : एका समाजाच्या जातीय भावना दुखावणारे गाणे यु-ट्यूब अपलोड करणारे आणि या संदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतरही फेसबुकवर जातीवाचक पोस्ट टाकणाऱ्या सचिन रामराव म्हस्के आणि राजरतन तुकाराम सोनार यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी फेटाळला. 

पुरोहित संघटनेचे अध्यक्ष सुभाष शंकर मुळे दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित सचिन म्हस्के (रा. चटेरी, जि. परभणी) व राजरतन सोनार (रा. कोधरी कोठरी, जि. परभणी) यांनी 18 जून 2018 रोजी यु-ट्यूबवर एका समाजाच्या भावना दुखावणारे गाणे अपलोड केले होते. याप्रकरणी तक्रारीवरुन सिडको पोलिस ठाण्यात त्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या संदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतरही संशयितांनी परत फेसबुकवर समाजाच्या भावना दुखावणारी पोस्ट टाकली होती. दरम्यान, दोन्ही संशयितांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला होता. त्या अर्जावरील सुनावणीदरम्यान, आरोपींनी गुन्हा केल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध झाले आहे. 

यु-ट्यूबवर टाकण्यात आलेल्या गाण्यामुळे दोन्ही समाजाच्या भावना दुखावल्या आहेत आणि आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केल्यास तणाव निर्माण होऊ शकतो. तसेच आरोपी साक्षीदारांवरही दबाव आणू शकतात. त्याचवेळी यु-ट्यूब व फेसबुकवर जातीवाचक गाणे व पोस्ट अपलोड करण्यासाठी कोणी मदत केली व सीडी कुठे तयार केली, कुणी केली, याचाही तपास करणे बाकी आहे. त्यामुळे दोन्ही आरोपींचा अटकपूर्व जामीन मंजूर करू नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील राजू पहाडिया यांनी केली. ही विनंती मान्य करुन न्यायालयाने दोन्ही आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

Web Title: On social media Communal Messages Viral Bail Application has Rejected by court