कोरोना लढ्यासाठी कलाशिक्षकाने दिला सामाजिक संदेश

korona.jpg
korona.jpg


धर्माबाद, (जि. नांदेड) ः ‘कोरोना’ने अवघे जग वेठीस धरले असताना या महामारीतून मानव जातीला सावरण्यासाठी जो तो आपापल्या परीने योगदान देत आहे. त्यात धर्माबाद शहरातील हुतात्मा पानसरे प्राथमिक शाळेतील कलाशिक्षक चंद्रशेखर अस्वार यांनी डॉक्टर, नर्स, पोलिस हेच आपले खरे देवदूत, ‘‘घरीच राहा नी नियम पाळा, जाईल पळून कोरोनाचं भूत’’ या शीर्षकाखाली सामाजिक संदेश देत कोरोना लढ्यासाठी जनजागृती करीत आहेत.

हेही वाचा -  मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी  या दोन बँकांनी केली इतक्या लाखाची मदत
पानसरे शाळेचे प्राथमिक कलाशिक्षक चंद्रशेखर अस्वार हे विविध चित्रकलेच्या माध्यमातून सामाजिक सतत जनजागृती करीत असतात. त्याचप्रमाणे त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर, नर्स, पोलिस हेच आपले खरे देवदूत, घरीच राहा नी नियम पाळा, जाईल पळून कोरोनाचं भूत, या शीर्षकाखाली चित्र रेखाटून जनतेला एक बोलका सामाजिक संदेश दिला आहे. कोरोना विषाणूवर आधारित जनजागृतीसाठी काढलेल्या या चित्राचे अनावरण उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, पोलिस निरीक्षक सोहन माछरे, पोलिस उपनिरीक्षक नागनाथ सनगल्ले यांच्या हस्ते धर्माबाद पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. १३) रोजी करून जनजागृतीला सुरवात करण्यात आली आहे.

तुम्ही घरात थांबा, आम्ही रस्त्यावर आहोत

सध्या संपूर्ण देशात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी सुरू आहे. या काळात कोरोना लढ्यासाठी येथील डाॅक्टर, नर्स, पोलिस प्रशासन, महसूल प्रशासन, पालिका कर्मचारी हे मानवतेचे पुजारी आपला जीव धोक्यात घालून तुम्ही घरात थांबा, आम्ही रस्त्यावर आहोत, असे आवाहन करीत नागरिकांसाठी कोरोना लढ्यात देवदूत बनून आपल्या जिवाची पर्वा न करता जनतेची सेवा बजावत असल्याचा त्यांनी चित्राद्वारे मांडला आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या घरातच थांबून या सर्व घटकांना आपण सहकार्य करून साथ देऊया, असा आशय चंद्रशेखर अस्वार यांनी आपल्या चित्रातून व्यक्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com