लोअर दुधना धरण क्षेत्रात उभारणार सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प

विलास शिंदे
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

सेलू : परभणी जिल्हा अणि परिसरातील, वीज टंचाई लक्षात घेऊन, राज्य सरकारने सेलू तालुक्यातील लोअर दुधना प्रकल्प धरण भिंत, धरण क्षेत्र या मधील जागेवर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे.नागपूर येथील पावसाळी अधिवेशन काळात ऊर्जामंत्री, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, यांचे विशेषकार्य अधिकारी राहुल देशपांडे यांनी प्रकल्प उभारणी साठी सादरीकरण केले होते.

सदरील प्रकल्पाला मंत्रीमोहदयांनी सकारत्मक प्रतिसाद दिल्याने लोअर दुधना प्रकल्प क्षेत्राची जागा, उर्जा विभाग, महाराष्ट्र शासन ह्यांच्याकडे हस्तांतरित करण्याकरिता आदेश पारित करण्यात आले आहे. लवकरच राज्य शासनाच्या महानिर्मिती कंपनीद्वारे या प्रकल्पाची तांत्रिक क्षमता तपासण्याचे काम चालू करणार असल्याचे माहिती महानिर्मिती सौर ऊर्जा विभागाचे मुख्य अभियंता विठ्ठल खटारे यांनी दिली आहे.

सुमारे शंभर मेगावॉट क्षमता असणारा हा प्रकल्प असून याची अंदाजे किंमत सहाशे कोटी रुपये असून त्याद्वारे सुमारे तिनशे स्थानिक लोकांना रोजगार निर्मिती मिळेल.राज्यातील पहिला प्रकल्प महाराष्ट्र राज्यातील धरण क्षेत्रा मध्ये उभारला जाणारा पहिला प्रकल्प असेल. तसेच या प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यातील इतर धरण क्षेत्राची तांत्रिक योग्यता तपासून प्रकल्प उभारणी करण्यात येईल, असे राज्याच्या ऊर्जा विभागाने नमूद केले आहे.

ऊर्जामंत्री व पाणीपुरवठा मंत्री यांच्या प्रयत्नाने हा प्रकल्प नावारूपाला येणार असून टेक्सटाईल पार्क, औद्योगिक वसाहत, नवीन राष्ट्रीय महामार्ग, सेलू शहर भूमिगत गटार योजना, इत्यादी महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी पाठपुरावा चालू असून लवकरच मान्यता मिळेल, असे पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री यांचे विशेष कार्यअधिकारी राहुल देशपांडे यांनी माहिती दिली आहे. यातील विशेष बाब म्हणजे राहुल देशपांडे हे याच परिसरातील भूमिपुत्र आहेत.

Web Title: Solar power generation project to be set up in Lower Dudhana Dam