सोलार यंत्रणा तीन वर्षांतच ठरली निष्क्रिय 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

बीड - तब्बल 35 लाख रुपये खर्च करून जिल्हाधिकारी कार्यालयात उभारलेली सोलार यंत्रणा अवघ्या तीन वर्षांतच निष्क्रिय ठरली आहे. विशेष म्हणजे ज्या कंपनीने हे सोलार दिले होते, ती कंपनी आता दुरुस्तीसाठीदेखील टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कामकाजात वीज समस्येचा अडथळा निर्माण होत असून सोलार यंत्रणेवरील खर्च पाण्यात गेल्याचे चित्र आहे. 

बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीवर 2014-15 मध्ये तब्बल 35 लाख रुपये खर्च करून सौरऊर्जेवर आधारित यंत्रणा उभी करण्यात आली. यासाठी मेडाच्या माध्यमातून अर्थसहाय्य करण्यात आले. जळगाव येथील सोयो सिस्टीम या कंपनीने ही यंत्रणा कार्यान्वित केली होती. सुरवातीचे काही दिवस या कामाचा मोठा गाजावाजा झाला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वीज बिलात मोठी बचत होत असल्याचे सांगण्यात आले; मात्र काही दिवसांतच ही यंत्रणा बुजगावणे बनली आहे. तीन वर्षांच्या आतच या यंत्रणेला घरघर लागली असून यंत्रणा सातत्याने बंद पडत आहे. या यंत्रणेवर पंखे आणि इतर उपकरणे तर दूर, अनेकदा दिवेदेखील लागत नाहीत अशी परिस्थिती आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत अनेकदा सदर कंपनीशी पत्रव्यवहार केला आहे; मात्र अपवाद वगळता कंपनीने या यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी प्रतिसाद दिलेला नाही. यामुळे 35 लाख पाण्यात गेल्याचे चित्र आहे.

Web Title: Solar system was settled within three years