नांदेड : फॉरेन्सीक लॅबमधून अनेक प्रकरणाचा निपटारा

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

नांदेड : येथील प्रादेशीक न्याय सहायक वैज्ञानीक प्रयोग शाळेत (फॉरेन्सीक लॅब) मागील दीड वर्षात 17 हजार 657 प्रकरणे दाखल झाली. त्यापैकी 32 हजार 114 नमुने निकाली काढण्यात आले.निकाली प्रमाण हे 80 टक्के असून अतिशय गंभीर किंवा शेतकरी आत्महत्येसारखे प्रकरण सात दिवसात निकाली काढण्यात येतात. अशी माहिती सहाय्यक संचालक संदीप चेट्टी यांनी ‘सकाळ' शी बोलताना दिली. 

नांदेड : येथील प्रादेशीक न्याय सहायक वैज्ञानीक प्रयोग शाळेत (फॉरेन्सीक लॅब) मागील दीड वर्षात 17 हजार 657 प्रकरणे दाखल झाली. त्यापैकी 32 हजार 114 नमुने निकाली काढण्यात आले.निकाली प्रमाण हे 80 टक्के असून अतिशय गंभीर किंवा शेतकरी आत्महत्येसारखे प्रकरण सात दिवसात निकाली काढण्यात येतात. अशी माहिती सहाय्यक संचालक संदीप चेट्टी यांनी ‘सकाळ' शी बोलताना दिली. 

गुन्हेगारांना शिक्षेपर्यंत पोहचविण्याचे महत्वाचे काम या फॉरेन्सीक लॅबचे असते. पोलिस तापस आणि न्यायालयीन प्रक्रिया यामधील महत्वाचा दुवा म्हणून या विभागाकडे पाहिल्या जाते. खून, दरोडा, लैंगीक अत्याचार, स्फोटक पदार्थ, नशेले पदार्थ, डीएनए यासह किचकट असलेल्या सायबर गुन्ह्यात फॉरेन्सीक लॅब पोलिस तपासात अहम 

भूमिका बजावते. सन 2017 ते जुलै 2018 या दीड वर्षाच्या काळात नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या चार जिल्ह्यातून 17 हजार 657 प्रकरणे दाखल झाली. त्यात जीवशास्त्र, विषशास्त्र, सामान्य विश्‍लेषण व उपकरणे तसेच दारुबंदीशास्त्र या विभागात ही प्रकरणे दाखल झाली. त्यापैकी 32 हजार 114 नमुने निकाली काढण्यात आले. यात काही अत्यंत किचकट व अवघड नमुने ज्यात, लैंगीक अत्याचार, मातीपरिक्षण, रक्त, विष आणि स्फोटक यांचा समावेश असतो. खून दरोडा, लैंगीक अत्याचार हे जीवशास्त्र या विभागात येतात. तर विष, अपघात, शेतकऱ्याची आत्महत्या यासारखी प्रकरणे ही विषशास्त्रात समाविष्ट असतात. नार्कोटींग, ड्रग्ज, हुंडाबळी, रॉकेल, स्फोटक यांची प्रकरणे दाखल करता येतात. यासोबतच अमली पदार्थ, दारु हे दारु शास्त्रात येतात. अत्यंत कमी मनुष्यबळ आणि आहे त्या यंत्र सामुग्रीवर हजारो नमुने निकाली काढण्यात आले.

नवीन इमारतीत ही लॅब गेल्यास डीएनए व सायबर गुन्ह्याची भर पडणार असल्याचे चेट्टी यांनी सांगितले. विष्णूपुरी परिसरात सव्वातीन एकरवर ही इमारत पोलिस गृहनिर्माणकडून बांधकामासाठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येतील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. नऊ कोटी रुपये त्यांच्या खात्यात टाकण्यात आले असून त्यांनीही जमीन टेस्टींग आणि फेन्सींगचे काम हाती घेतल्याचे चेट्टी यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solves many cases from forensic lab in nanded