नांदेड : वडिलांचा खून, मुलास जन्मठेप

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 25 ऑक्टोबर 2018

नांदेड : शेती नावावर करून देत नसल्याने जन्मदात्याचा खून करणाऱ्या मुलाला येथील जिल्हा न्यायाधिश एस. एस. तोडकर यांनी जन्मठेपेची गुरूवारी (ता. 25) शिक्षा सुनावली. 

नांदेड : शेती नावावर करून देत नसल्याने जन्मदात्याचा खून करणाऱ्या मुलाला येथील जिल्हा न्यायाधिश एस. एस. तोडकर यांनी जन्मठेपेची गुरूवारी (ता. 25) शिक्षा सुनावली. 

अर्धापूर तालुक्यातील कामठा (बु) येथील मारोती नागोबा साखरे (वय 72) हे आपल्या परिवरासाह राहत होते. त्यांना पाच मुल व दोन मुली असून त्यांनी सर्वांचे लग्न लावून दिले. ते आपआपला कारभार करीत होते. म्हातारपणात कोणताच मुलगा सांभाळत नसल्याने ओळखीच्या लोकांकडून दहा, विस रुपये घेऊन गंडेदोरे टाकून आपला उदरनिर्वाह चालवित असत. परंतु पाच मुलापैकी संभाजी मारोती साखरे (वय 36) हा त्यांना त्रास देत असे. गंडेदोरे टाकण्याची कला मला द्या, किंवा तुमाच्या नावे असलेले 50 गुन्ठे शेत माझ्या नावे करून द्या. असे म्हणून तो तगादा लावत असे. ती जमीन शिवराम साखरे हा वहीत करीत होता. आपणास शेतही नाही व दुसरे कामही नाही म्हणून रागाच्या भरात संभाजी साखरे याने 19 नोव्हेंबर 2016 मध्ये रात्री दहाच्या सुमारास झोपेत असलेल्या वडिल मारोती साखरे (वय 72) यांच्यावर कत्तीने वार करून गळा चिरला. यातच त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी शिवराम मारोती साखरे यांच्या फिर्यादीवरुन अर्धापूर पोलिस ठाण्यात संभाजी साखरे विरूध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिस निरीक्षक विजय डोंगरे यांनी आपल्या सहकाऱ्यासह योग्य तपास लावून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने यात ११ साक्षिदार तपासले. सर्व पुरावे व वैद्यकिय अहवालावरून न्यायाधिश एस. एस. तोडकर यांनी पित्याचा खून करणाऱ्या मुलास जन्मठेप व रोख पाच हजाराच्या दंडाची शिक्षा ठोठावली. यावेळी आरोपी संभाजी साखरे याचे सर्व नातेवाईक न्यायालयात हजर होते. 

Web Title: son get punished for father s murder