लातूर जिल्ह्यात भुकंपग्रस्त भागात भूगर्भातून आवाज 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 7 जानेवारी 2019

जिल्ह्यातील भूकंपग्रस्त भागामध्ये सोमवारी दुपारी भूगर्भातून आवाज आल्याची घटना घडली. मात्र नागरिकांमध्ये भूकंप झाल्याची अफवा पसरली आहे. लातूर येथील भूकंप वेधशाळेत मात्र भूकंपाची कोणत्या प्रकारची नोंद झालेली नसल्याची माहिती सांगण्यात आली.

लातूर- जिल्ह्यातील भूकंपग्रस्त भागामध्ये सोमवारी दुपारी भूगर्भातून आवाज आल्याची घटना घडली. मात्र नागरिकांमध्ये भूकंप झाल्याची अफवा पसरली आहे. लातूर येथील भूकंप वेधशाळेत मात्र भूकंपाची कोणत्या प्रकारची नोंद झालेली नसल्याची माहिती सांगण्यात आली.

औसा तालुक्यातील नांदुर्गा, गुबाळ, मंगरूळ, गांजनखेडा, सारणी परिसरास आज सकाळी ठीक 11.59 वा भूगर्भातून आवाज आला. सर्व नागरिकांना मात्र हा भूकंपाचा सौम्य धक्का बसला असेच वाटले . यामुळे परिसरातील नागरिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. नागरिक भीतीने घरासमोरील मोकळ्या जागेत येऊन थांबले होते.

लातूर येथील भूकंप वेधशाळेमध्ये यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी लातूर जिल्ह्यात कुठे भूकंप झालेला नाही. भूकंप झाल्याची नोंद केंद्रात झालेली नाही असे सांगितले. भूकंप झाल्याची सगळीकडे विचारणा होत असल्याचेही त्यांनी सांगितले मात्र हा भूकंप झालेला नसून भूगर्भातून आवाज आलेला असावा असे त्यांनी सांगितले.

Web Title: sounding earthquakes in Latur district