
हिंगोली : या वर्षी परतीच्या पावसाने खरीप पिकाच्या नुकसानीनंतर जमिनीत ओलावा असल्याने शेतकऱ्यांनी रब्बी पेरणीवर भर दिला. मात्र पावसामुळे पेरणी लांबल्याने हरभरा पिकाच्या पेऱ्यात वाढ झाली आहे. यावर्षी जिल्ह्यात एक लाख ३१ हजार ५३ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. त्यापैकी तब्बल ९२ हजार ६८४ हेक्टवर हरभरा पिकाची पेरणी झाली आहे.
दरवर्षी दिवाळीपूर्वी रब्बीच्या पेरण्या होतात. या वर्षी मात्र दिवाळीपर्यंत सुरू असलेल्या परतीच्या पावसाने रब्बीची पेरणी देखील लांबली. परतीच्या पावसाने रब्बी हंगामासाठी पाणी उपलब्ध झाले. तसेच शेतात ओलावा असल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांनी हरभरा पिकास पसंती दिली. तसेच सिंचनाच्या पिकांनाही पसंती दिली. जिल्ह्यात एक लाख ४९ हजार ५८६ सर्वसाधारण क्षेत्रापैकी १ लाख ३१ हजार ५३ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे.
हेही वाचा...परदेशी अभ्यासकांनाही संत जनाबाईंची भुरळ
हरभरा पाठोपाठ गव्हास प्राधान्य
यात १२ हजार ५१ क्षेत्रापैकी ११ हजार ४२ हेक्टरवर ज्वारीची पेर झाली आहे. गहू ४४ हजार ४७० पैकी २६ हजार ६२४, मका १०१९ पैकी ४२० हेक्टर क्षेत्र, हरभऱ्याच्या सर्वसाधारण ७२ हजार ८५६ हेक्टर क्षेत्रापैकी ९२ हजार ६८४ हेक्टर, एकूण कडधान्यात ९२ हजार ६८५ पैकी ७३ हजार ५१ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. सध्या पीक जोमदार असून अनेक ठिकाणी शेतकरी मशागत करत आहेत. सध्या तरी उत्पादन निघण्याची आशा निर्माण झाली आहे.
परतीच्या पावसाने खरीप हंगामाचे नुकसान
या वर्षी सुरवातीला अपुऱ्या पावसाने खरीपाच्या पेरण्या उशीराने झाल्या. त्यामुळे मूग, उडीद या दाळवर्गीय पिकाची पेरणी कमी झाली. तर सोयाबीन, कापूस, तूर या पिकाला पसंती शेतकऱ्यांनी दिली. पेरणीनंतर मध्यंतरी झालेल्या रिमझीम पावसाने पिके वाढीस लागली. मात्र सोयाबीनला शेंगा लागण्याच्या वेळी पावसाची आवश्यकता असताना पावसाने पाठ फिरविली. कापूस पिकाची देखील अशीच अवस्था झाली. सोयाबीन काढणीच्या वेळी परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले. तसेच कापूस पिकाचे फुटलेले बोंडे पावसाने सडून नुकसान झाले.
उघडून तर पहा... ‘या’ गावची केळी सातासमुद्रापार - कोणतं आहे हे गाव, वाचा सविस्तर
तालुकानिहाय पेरणी क्षेत्र
जिल्ह्यात ८७.६१ टक्के पेरणी झाली आहे. यामध्ये हिंगोली तालुक्यात ३० हजार ५०२ हेक्टर क्षेत्रापैकी ३० हजार ३२४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कळमनुरी ४० हजार ५६६ क्षेत्रापैकी २७ हजार ४०७, वसमत ४१ हजार ८०८ पैकी ३१ हजार ७६७, औढा नागनाथ १५हजार १८ हेक्टर क्षेत्रापैकी ९ हजार ९३४, सेनगाव २१ हजार ६११ हेक्टर क्षेत्रापैकी १४ हजार ५८६ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे.
एक लाख ४९ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी
यावर्षी रब्बीच्या हंगामात हरभरा पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. जिल्ह्यात सर्वसधारण एक लाख ४९ हजार ५८६ हेक्टर क्षेत्रापैकी एक लाख ३१ हजार ५३ हेक्टर क्षेत्रावर सोमवारपर्यंत (ता.१६) प्रत्यक्ष पेरणी झाली आहे.
-विजय लोखंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.