Beed News : येत्या आठवड्यात कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक बीडच्या कारागृहात येणार; वादग्रस्त 'कॉल रेकॉर्डिंग' अन् अवैध कारभाराची स्वतः करणार झाडाझडती

​बीड कारागृहातील कट-कारस्थानांच्या तक्रारींनंतर थेट वरिष्ठ पातळीवरून कारवाईची कुऱ्हाड; खासदार बजरंग सोनवणेंच्या पत्रानंतर आयजी योगेश देसाई स्वतः मैदानात.
beed district jail

beed district jail

sakal

Updated on: 

- नितीन चव्हाण

बीड - बीड जिल्हा कारागृहातील कथित कट-कारस्थान, मोबाईल वापराचा संशय आणि वारंवार समोर येणाऱ्या वादग्रस्त प्रकरणांमुळे आता संपूर्ण राज्याच्या पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह बीड जिल्ह्यातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या गंभीर तक्रारींची वरिष्ठ पातळीवर कडक दखल घेण्यात आली असून, विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) योगेश देसाई हे येत्या आठवड्यात स्वतः बीड जिल्हा कारागृहात दाखल होणार आहेत. कारागृहातील संपूर्ण गैरप्रकारांची आणि वादग्रस्त प्रकरणांची ते स्वतः सखोल चौकशी करणार असल्याची माहिती त्यांनीच सकाळशी बोलतांना फोनवरून दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com