पुणे, मुंबईसाठी नांदेडहून लातूरमार्गे विशेष रेल्वे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

औरंगाबाद - उन्हाळ्याची सुट्टी लक्षात घेता दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातर्फे पुणे, मुंबईसाठी विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. ही रेल्वे परभणी, लातूररोड मार्गे धावणार असून तिच्या २६ फेऱ्या होणार आहेत. या विशेष रेल्वेच्या मार्गातून औरंगाबाद-जालन्याला मात्र डावलले आहे. 

नांदेड विभागातर्फे नांदेड ते पनवेल रेल्वे (क्र.०७६१७) पाच मेपासून दर शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता नांदेड रेल्वे स्थानकावरून सुटेल. ती परभणी, परळी, लातूर, उस्मानाबाद, पुणेमार्गे पनवेल येथे दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता पोचेल. याप्रमाणे नांदेड रेल्वेस्थानकावरून ही विशेष रेल्वे १२, १९, २६ मे, जून महिन्यात २, ९, १६,२३ आणि ३० जून तर जुलै महिन्यात ७, १४,२१ आणि २८ जुलैला सोडण्यात येईल. या रेल्वेच्या १३ फेऱ्या होतील. दुसरी रेल्वे पनवले ते नांदेडसाठी ६ मेपासून सुरू करण्यात येणार आहे. ती पनवेलमधून सकाळी दहाला सुटेल. पुणे, उस्मानाबाद, लातूर, परळी, परभणीमार्गे नांदेडला पोहचेल. ही रेल्वे मेमध्ये ६, १३, २० आणि २७ ला सुटेल, तर ३,१०,१७,२४ जून आणि १,८,१५,२२,२९ जुलैला सोडण्यात येणार आहे.

प्रवाशांत संताप
औरंगाबादेतून पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या सर्व रेल्वे, ट्रॅव्हल्स, एस. टी. महामंडळाच्या बसेस फुल्ल असतात. औरंगाबादेतून मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे सुरू करण्याची मागणी नागरिक, लोकप्रतिनिधींनी केली होती. मात्र, रेल्वे विभागाने या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. आता पुन्हा नांदेडहून परळीमार्गे विशेष रेल्वे सोडून औरंगाबाद, जालनेकरांच्या तोंडाला पाने पुसली असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून येत आहेत. 

Web Title: special railway pune mumbai nanded latur