जिल्ह्यात तुर खरेदीला वेग

कैलास चव्हाण
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

परभणी जिल्ह्यात सोयाबीन आणि कापुस पिकात अंतरपिक म्हणून तुर पिक घेतलले जाते. सोयाबीन आणि तुर हे समिकरण झाले आहे.

परभणी  : जिल्ह्यात ५ हजार ८०० रुपये हमीभावाने तुर खरेदीला वेग आला असून नाफेडच्या सात पैकी चार खरेदी केंद्रावर १ हजार ८४८.४८ क्विंटल तर विदर्भ फेडरेशनच्या खरेदी केंद्रावर ५९९ क्विंटल तुर खरेदी करण्यात आली आहे. अशी एकुण २ हजार ४४७.४८ क्विंटल तुर खरेदी करण्यात आली आहे. आतापर्यंत नाफेडकडे ११ हजार ६०१ शेतकऱ्यांनी तर विदर्भ फेडरेशनच्या गंगाखेड आणि मानवतच्या केंद्रावर २ हजार ७०० शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंद केली आहे.

परभणी जिल्ह्यात सोयाबीन आणि कापुस पिकात अंतरपिक म्हणून तुर पिक घेतलले जाते. सोयाबीन आणि तुर हे समिकरण झाले आहे. गत खरिप हंगामात ५६ हजार ३४४ हेक्टरवर तुरीची पेरणी झाली होती. तुर फुलात आली असताना ऑक्टोबर-नोव्हेंबर महिण्यात दमदार पाऊस होत गेल्याने तुर पिकाला मोठा लाभ झाला. पाणी देण्याची गरज असतानाच पावसामुळे तुर आणखी बहारात येऊन उत्पादनात वाढ झाली. पावसामुळे काढणीला उशीर झाला आहे. मागील १५ ते २० दिवसापासून काढणीला वेग आला असून जवळपास काढणी पूर्ण होत आली आहे.

हेही वाचा - `त्या’ शिक्क्यांनी महिलेला दिला धक्का...

खरेदीला सुरुवात
जिल्ह्यात नाफेडच्यावतीने परभणी, पालम, पाथरी, पूर्णा, सेलु, जिंतूर, सोनपेठही खरेदी केंद्रे आहेत. त्यापैकी सेलु आणि जिंतूर येथे सोमवारपर्यंत खरेदी सुरु करण्याची कार्यवाही पूर्ण होणार आहेत. तर सोनपेठ येथे शुक्रवारी (ता.२१) खरेदीला सुरुवात होत आहे.उर्वरीत ठिकाणी खरेदीला सुरुवात झालेली आहे. किमान आधारभुत किंमत योजनेअंतर्गत तुर विक्रीसाठी जिल्हा विपनन अधिकारी  कार्यालय (नाफेड)च्या केंद्रात  ता.एक फेब्रुवारीपासून नोंदणीस प्रारंभ झाला आहे. त्यानंतर टप्याटप्याने खरेदी केंद्र सुरु करण्यात आले.

हेही वाचा - पोलिस दलातील ‘ब्रुनो’चा वाढदिवस !

फेडकडे ११ हजार ६०१ शेतकऱ्यांनी नोंदणी

आतापर्यंत नाफेडकडे ११ हजार ६०१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यातील २३० शेतकऱ्यांची १ हजार ८४८.४८ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे. गंगाखेड येथील विदर्भ फेडरेशनच्या केंद्रावर १ हजार ३०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ९ शेतकऱ्यांची ६६ क्विंटल तुर खरेदी करण्यात आली आहे. मानवत केंद्रावर १ हजार ४०० ऑनलाईन नोंद आणि ५२ शेतकऱ्यांची ५३३ क्विंटल तुर खरेदी झाली आहे.

नाफेडची केंद्रनिहाय नोंदणी (कंसातील शेतकऱ्यांची संख्या)
परभणी २,८५८, जिंतूर ३,५५०, सेलु १, ४५५, पालम १,४५०, पाथरी ५०७, पूर्णा १, १६०, सोनपेठ ६२१ एकुण ११,६०१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

खरेदी झालेली तुर
नाफेड केंद्र    शेतकरी       तुर
परभणी       ११४         १,०८९.५०
पालम       ०९           ८५.२२
पाथरी      १८         १५५.६६
पूर्णा        ४१            ५१८
एकुण     १८२       १,८४८.३८
....


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Speed ​​Trumpet shopping in the district