Udgir News : क्रीडा विभागाच्या वाढीव तरतुदीने क्रीडा चळवळ प्रगल्भ होणार - संजय बनसोडे

युवा महोत्सवात सहभागी मान्यवरांच्या प्रतिक्रिया
sports minister sanjay bansode info funding increase of maharashtra
sports minister sanjay bansode info funding increase of maharashtrasakal

उदगीर : देशातील अन्य राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राचा क्रीडा विभाग आर्थिक दृष्ट्या कमकुवत होता.मात्र क्रीडा व युवक मंत्री संजय बनसोडे यांनी मंत्रीपदाचा पदभार घेतल्यानंतर क्रीडा विभागाच्या निधीत तीन ते चार पटीने वाढ केल्याने याचा फायदा खेळाडूंना होणार आहे.

महाराष्ट्राची क्रीडाचळवळ अधिक गतिमान व प्रगल्भ होणार असल्याच्या प्रतिक्रिया युवा महोत्सवात सहभागी असलेल्या राष्ट्रीय, राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त खेळाडूनी व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्राची क्रीडा चळवळ निधी अभावी मंदावली होती. सध्या राष्ट्रीय पातळीवर यश मिळवणाऱ्या खेळाडूंना केंद्र शासन जेवढी रक्कम देते.

त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य क्रीडा विभागाकडूनही दिली जात आहे ही खेळाडूंसाठी अतिशय गौरवाची बाब आहे. ग्रामीण भागात अनेक नवीन खेळाडू निर्माण होण्यासाठी यामुळे मदत मिळणार आहे.

पूर्वी जिल्हा पातळीवर क्रीडा सप्ताह, क्रीडा दिन साजरा करण्यासाठी दहा ते वीस हजार एवढी तोकडी रक्कम या विभागाच्या वतीने देण्यात येत होती. मात्र क्रीडामंत्री बनसोडे यांनी या भरीव वाढ करून सव्वा दोन लाख रुपये वाढीव तरतूद केल्याने क्रीडा चळवळ गतिमान होणार आहे.

देशातील इतर राज्यांच्या बरोबरीने आता महाराष्ट्राचा क्रीडा विभाग ही निश्चितपणे आपले खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकवण्यासाठी सज्ज झाल्याचे यावरून दिसून येते. येथील संपन्न झालेल्या राज्यस्तरीय युवा महोत्सवात अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू,

जीवन गौरव पुरस्कार प्राप्त खेळाडू व शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू कोणी परीक्षक तर कोणी पाहुणे म्हणून दाखल झाले होते यातील काहीजणांच्या प्रातिनिधीक स्वरूपातील प्रतिक्रिया क्रीडा विभागाच्या वाढीव निधीमुळे क्रीडा चळवळ प्रगल्भ होणार असल्याच्या देण्यात आल्या आहेत.

दिवसेंदिवस खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. अनेक खेळाडू निर्माण होण्यासाठी त्यांना अतिशय मेहनत व आर्थिक खर्च करावा लागतो आहे. यात क्रीडा विभागाचा तोकडा निधी खेळाडूवर परिणाम करणारा होता. मात्र आता वाढीव तरतूद झाल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू निर्माण होण्यास मदत होणार आहे.

-उदय देशपांडे दादोजी कोंडदेव व जीवनगौरव पुरस्कार प्राप्त खेळाडू

क्रीडा व युवक विभागाच्या वतीने करण्यात आलेली वाढीव निधीची तरतूद कलाकारांना चालना देणारी ठरेल. युवक कलावंतांना विविध कला संस्कृती जपण्यासाठी अधिक ताकतीने सराव करणे व ही कला सादर करणे यासाठी या निधीचा उपयोग होणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे नक्कीच खेळाडू युवा कलावंतांना देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचण्यासाठी मदत होणार आहे.

- पंकज खेडकर परीक्षक परभणी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com