नांदेड : 'एसआरपीएफ'च्या गाडीला अपघात; 13 जवान जखमी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मे 2019

रस्त्याचे काम चालू असल्याने एस.आर.पी.एफ.बल.गट नं. १३ गडचिरोलीचे वाहन क्र.एम.एच. ३१ डी.झेड. ०२५२  पलटी खाल्यामुळे वाहनामधील १ जवान गंभीर तर  १३ जवान किरकोळ जखमी झाले. त्याना औषधोपचार कामी बारड येथे शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

नांदेड : नांदेड येथे निवडणुकीच्या बंदोबस्ताच्या कामासाठी जाणाऱ्या जवानांच्या गाडीला शेंबोली ते बारड या दोन्ही गावाच्या दरम्यान आज (बुधवारी) सकाळी साडेसातच्या सुमारास अपघात झाला.

रस्त्याचे काम चालू असल्याने एस.आर.पी.एफ.बल.गट नं. १३ गडचिरोलीचे वाहन क्र.एम.एच. ३१ डी.झेड. ०२५२  पलटी खाल्यामुळे वाहनामधील १ जवान गंभीर तर  १३ जवान किरकोळ जखमी झाले. त्याना औषधोपचार कामी बारड येथे शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

बल गट क्रमांक - १३ चे जवान नांदेड येथे वाहनाने निवडणूक बंदोबस्तासाठी जात होते. यावेळी रस्त्यावरील शेंबोली ते बारड या दोन्ही गावाच्या मध्यभागी येथे समोरील वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकांनी वाहन रस्त्याच्या कडेला उभे करण्याच्या प्रयत्नात वाहन पलटी झाले. जखमी झोलल्या जवानांची नावे कळू शकले नाही अपघातानंतर जखमींना बाहेर काढण्यासाठी महामार्गाचे पोलिस कर्मचारी व परिसरातील नागरिकांनी मदत केली. जखमी जवानांवर बारड येथील शासकिय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SRPF jawan injured in accident near Nanded