esakal | SSC Result 2021: विद्यार्थ्यांनी सहज दिलेली घोषणा खरी ठरली..!
sakal

बोलून बातमी शोधा

result

SSC Result 2021: विद्यार्थ्यांनी सहज दिलेली घोषणा खरी ठरली..!

sakal_logo
By
विकास गाढवे

लातूर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी (ता. १६) दहावीचा निकाल जाहीर झाला आणि सरसकट सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हा ऐतिहासिक निकाल केवळ कोरोनामुळे शक्य झाला. मात्र, निकालामुळे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी १९ मार्च रोजी मंडळाच्या कार्यालयासमोर केलेल्या आंदोलनाला उजाळा मिळाला. आंदोलनात विद्यार्थ्यांनी सहजच दिलेली एक घोषणा खरी ठरली. `एकच ध्यास, सगळेच पास`, अशी ती घोषणा होती. कोरोनामुळे गेल्यावर्षी दहावी व बारावी परीक्षांच्या तारखा पुढे सरकत गेल्या. यातच २३ एप्रिलपासून मंडळाने दहावी व बारावी परीक्षेचे नियोजन केले होते. त्याला विद्यार्थी व पालकांनी विरोध केला. कोरोनाचा प्रसार वाढल्याने या परीक्षा विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्यात ठरत होत्या. मात्र, मंडळांकडून परीक्षांची तयारी सुरूच होती. यातूनच शहरातील विद्यार्थ्यांनी एकत्र येत मंडळाच्या येथील विभागीय कार्यालयासमोर १९ मार्च रोजी ठिय्या आंदोलन केले.

या आंदोलनामुळे मंडळ परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. विद्यार्थ्यांनी विभागीय सचिवांना मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर कार्यालयासमोर घोषणाबाजी केली. या घोषणांत `एकच ध्यास, सगळेच पास` ही घोषणा विद्यार्थी पोटतिडकीने देत होते. घोषणेतील त्यांचे भाव मंडळाने सर्वांनाच उत्तीर्ण करावे, याच मागणीचे होते. अर्ध्याच अभ्यासक्रमावर आणि विद्यार्थ्यांना लस देऊनच परीक्षेचे नियोजन करावे, आदी मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या होत्या.

हेही वाचा: SSC Result 2021: दहावीच्या दहा हजार विद्यार्थ्यांना बोनस गुण

मात्र, काळाच्या ओघात परिस्थिती बदलत गेली. `आंधळा मागतो एक अन् देव देतो दोन` याप्रमाणे दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या आणि विद्यार्थ्यांची `सगळेच पास`ची घोषणा कोरोनाने खरी ठरवली. या घोषणेमुळेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला उजाळा मिळाला. दरम्यान लातूर विभागातील तीन जिल्ह्यात मिळून दहावीचे केवळ ३३ विद्यार्थी नापास झाले. यात बहुतांश शाळेत सतत गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचे मंडळाच्या सुत्रांनी सांगितले.

२७८ विद्यार्थ्यांची सेंचूरी-

बोनस गुणांमुळे दहावी परीक्षेत विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळत आहेत. परीक्षा देऊन असे गुण मिळवणाऱ्यांच्या तुलनेत परीक्षा न देता पैकीच्या पैकी गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा दुपटीने वाढली आहे. गेल्यावर्षी शंभर टक्के गुण मिळवलेले १५१ विद्यार्थी होते. यात लातूर जिल्ह्यातील १२९, उस्मानाबादमधील १९ तर नांदेड जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांचा समावेश होता. शुक्रवारी जाहिर झालेल्या निकालानुसार दहावीच्या २७८ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत. यात लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याचे मंडळाचे सहायक सचिव संजय पंचगल्ले यांनी सांगितले.

हेही वाचा: लातुरात बांधावरील ५० चंदनाच्या झाडांची चोरी!

परीक्षा न घेता मंडळाने शुक्रवारी पहिल्यांदाच दहावीचा निकाल जाहीर केल्यामुळे मंडळाच्या कामाचा मोठा भार हलका झाला आहे. परीक्षा घेण्यासाठी प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांच्या छपाईपासून केंद्रांचे नियोजन, भरारी पथके, परीक्षेतील गैरप्रकारावर नियंत्रण, उत्तरपत्रिकांचे संकलन, त्यांची तपासणी, त्यासाठी शिक्षकांकडे पाठपुरावा, परीक्षेचा निकाल जाहिर झाल्यानंतर उत्तरपत्रिकांची झेरॉक्स देणे, फेरमुल्यांकन, फेरपडताळणी आदी एक ना अनेक कामे पार पाडताना मंडळाची वर्षभर कसरत सुरू होती. यासाठी लागणाऱ्या खर्चाची तोंडे बुजवतानाही मंडळाला आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत होता. परीक्षा रद्द होऊन केवळ निकालाची भानगड राहिल्याने मंडळावरील कामाचा बोजा हलका झाला आहे. यामुळे सर्वांनाच हायसे वाटत आहे.

मंडळाचा भार हलका

परीक्षा न घेता मंडळाने शुक्रवारी पहिल्यांदाच दहावीचा निकाल जाहिर केल्यामुळे मंडळाच्या कामाचा मोठा भार हलका झाला आहे. परीक्षा घेण्यासाठी प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांच्या छपाईपासून केंद्रांचे नियोजन, भरारी पथके, परीक्षेतील गैरप्रकारावर नियंत्रण, उत्तरपत्रिकांचे संकलन, त्यांची तपासणी, त्यासाठी शिक्षकांकडे पाठपुरावा, परीक्षेचा निकाल जाहिर झाल्यानंतर उत्तरपत्रिकांची झेरॉक्स देणे, फेरमुल्यांकन, फेरपडताळणी आदी एक ना अनेक कामे पार पाडताना मंडळाची वर्षभर कसरत सुरू होती. यासाठी लागणाऱ्या खर्चाची तोंडे बुजवतानाही मंडळाला आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत होता. परीक्षा रद्द होऊन केवळ निकालाची भानगड राहिल्याने मंडळावरील कामाचा बोजा हलका झाला आहे. यामुळे सर्वांनाच हायसे वाटत आहे.

loading image