ST Bus Crashes in Yeramala Ghat
sakal
येरमाळा - येरमाळा घाटात गुरुवारी रात्री झालेला बार्शी आगाराच्या बसचा अपघात म्हणजे प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना ठरली. घाटातील चढ चढत असताना ब्रेक निकामी झाल्याने बस अचानक मागे सरकू लागली. ‘आता काहीतरी जीवावर बेतणार’ असे वाटत असतानाच क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली. हाच प्रकार घाटात शंभर मिटर मागे घडला असता तर बस बारा मिटर खड्यात बस कोसळून मोठी जीवित हानी घडली असती घाटाच्या शेवटच्या वळणावर हा प्रकार घडल्याने मोठा अनर्थ टाळला असला तरी प्रत्यक्ष अपघात ठिकाणी बसने दोन-तीन पलट्या घेत बस एका बाजूवर थांबल्याने प्रवाशांमध्ये एकच आरडाओरड व गोंधळ उडाला.