ST Strike|अल्टिमेटमनंतर जालन्यातील एसटी कर्मचारी कामावर येईनात

मागील महिनाभरापेक्षा अधिक काळापासून एसटी कर्मचाऱ्यांचा विलिनीकरणाच्या मागणीसाठी संप सुरू आहे.
st strike
st strike sakal

जालना : मागील महिनाभरापेक्षा अधिक काळापासून एसटी कर्मचाऱ्यांचा विलिनीकरणाच्या मागणीसाठी संप सुरू आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांनी सोमवारी (ता.१३) अल्टिमेटम दिल्यानंतर जालना (Jalna)जिल्ह्यातील एसटी कर्मचारी आतापर्यंत कामावर रूजू झाले नाहीत. त्यामुळे सोमवारी परतूर आगारातून तीन बस वगळता इतर जिल्ह्यातील आगारातून एक ही बस धावली नाही. जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य परिवहन (MSRTC) विभागाचे कर्मचारी सात नोव्हेंबपासून विलिनीकरणाच्या मागणीसाठी संपावर गेले आहेत. त्यामुळे मागील महिनाभरापेक्षा अधिक काळापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. परिणामी जालना जिल्ह्यातून महामंडळाला प्रतिदिन मिळाणारे २४ लाखांचा महसुल बुडाला आहे. (ST Workers Strike Continue In Jalna District)

st strike
Aurangabad News : पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर बलात्कार

परिणामी या संपामुळे आतापर्यंत तब्बल आठ कोटी ५२ लाखांचा महसुल महामंडळाचा बुडाला आहे. तर दुसरीकडे प्रवाशांचे नाहक हाल सुरू आहेत. त्यामुळे सोमवारी कामावर हजार होण्याचा अल्टिमेटम परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिल्यानंतर जिल्ह्यातील एसटी कर्मचारी संपावर ठाम असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले आहे. दरम्यान सोमवारी परतूर आगारातून केवळ तीन बस धावल्या. तर जिल्ह्यातील जालना, जाफराबाद, अंबड आगारातून एक ही बस धावली नाही. त्यामुळे या संपावर तोडगा निघणार ही नाही, असा प्रश्न उपस्थित होत असून प्रवाशी मात्र एसटी कधी सुरू होणार याकडे डोळे लावून बसले आहेत.

st strike
पंकजा मुंडेंनी ऊसतोड कामगारांसमवेत घेतला भाजी भाकरीचा आस्वाद

औरंगाबाद आगाराच्या बसचा आधार

औरंगाबाद आगारातून काही बस सुरू झाल्या आहेत. त्यामुळे औरंगाबाद आगारातून औरंगाबाद-जालना दरम्यानच्या काही बस फेऱ्या सुरू झाल्या आहेत. ही बससेवा सुरू झाल्याने प्रवाशांना हा प्रमाणात आधार मिळाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com