स्टेनलेस स्टील जलतरण तलावाच्या चाचण्या सुरू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

औरंगाबादेत भारतीय खेळ प्राधिकरणमध्ये देशातील पहिला स्टेनलेस स्टील जलतरण तलाव उभारण्यात येतो आहे. तलावाचे काम पूर्ण झाले असून त्याची चाचणी आता घेतली जाते आहे.

औरंगाबाद - भारतीय खेळ प्राधिकरणच्या औरंगाबाद केंद्रात उभारण्यात येत असलेल्या देशातील पहिल्या स्टेनलेस स्टील जलतरण तलावाची जलचाचणी आता सुरू झाली आहे. पंधरा दिवसांपासून या तलावात पाणी सोडण्यात आले असून महिनाभरात काम पूर्ण केले जाणार आहे. 

औरंगाबादेत भारतीय खेळ प्राधिकरणमध्ये देशातील पहिला स्टेनलेस स्टील जलतरण तलाव उभारण्यात येतो आहे. तलावाचे काम पूर्ण झाले असून त्याची चाचणी आता घेतली जाते आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून या तलावात दोन वेळा पाणी सोडण्यात आले असून वाफ होण्यापलिकेडे यातून गळती झाली नसल्याचा दावा हे काम करणाऱ्या एनपीसीसीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर हा जलतरण तलाव सर्वसामान्यांसाठी खुले होण्याची अपेक्षा असताना मात्र त्यासाठी अजून एक महिना वाट पहावी लागणार आहे. त्यामुळे मात्र यंदाचा यातून मिळू शकणाऱ्या महासुलवर मात्र पाणी सोडावे लागणार आहे. सध्या या तलावात दुणारे एक फूट पाणी असून प्रेशर आणि अन्य चाचण्या घेतल्या जात आहेत. तलावालगत उभारण्यात येत असलेल्या मल्टिपर्पज हॉल आणि चेंजिंगरूमचे काम अंतिम टप्प्यात आहे. व्हीआयपी लॉंग लगतच्या भिंतीचे काम पूर्ण झाले असून त्यावरील शेडचे काम आता हाती घेण्यात येणार आहे. 

जलपुनर्भरण प्रकल्प करणार 
पावसाचे पाणी वाहून जाऊ ना देत ते साठवण्यासाठीचा प्रकल्प या जलतरण तलावावर हाती घेण्यात आला आहे. मुख्य प्रवेश द्वारालगत त्यासाठी एक हौदही बांधण्यात येणार आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Stainless Steel Swimming Pool Tests Start