राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनुसार नगरपंचायत सदस्य पदांच्या आरक्षणाची (अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील महिला, नागरिकांचा मागासवर्ग, प्रवर्ग व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला) सोडत शुक्रवारी निश्चित करण्यात आलेली आहे.
हिंगोली : राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील सेनगाव व औंढा नागनाथ नगरपंचायतीच्या प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. त्यानुसार येथील प्रारुप प्रभाग रचनेस मान्यता देण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनुसार नगरपंचायत सदस्य पदांच्या आरक्षणाची (अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील महिला, नागरिकांचा मागासवर्ग, प्रवर्ग व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला) सोडत शुक्रवारी निश्चित करण्यात आलेली आहे.
येथील प्रारुप प्रभाग रचनेस गुरुवारी (ता.१९ नोव्हेंबर) रोजी मान्यता देण्यात आलेली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनुसार नगरपंचायत सदस्य पदांच्या आरक्षणाची (अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील महिला, नागरिकांचा मागासवर्ग, प्रवर्ग व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला) सोडत शुक्रवारी (ता. २७ नोव्हेंबर) निश्चित करण्यात आलेली आहे.
सेनगाव व औंढा नागनाथ नगरपंचायतीची सोडत शुक्रवारी (ता. २७ नोव्हेंबर) सकाळी ११ वाजता संबंधित तहसील कार्यालयात होणार आहे. सेनगांव नगरपंचायत सदस्य पदाच्या आरक्षणाची सोडत उपविभागीय अधिकारी, हिंगोली यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय, सेनगांव परिसरात नवीन गोदाम येथे तर औढा नागनाथ नगरपंचायत सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत उपविभागीय अधिकारी वसमत यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय औंढा ना. येथे आयोजित केली आहे. नागरिकांनी या सोडतीच्या वेळी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.
संपादन - सुस्मिता वडतिले