मराठवाड्याच्या विकासावर राज्य सरकारचा फोकस - मुख्यमंत्री

उमेश वाघमारे
शुक्रवार, 4 मे 2018

जालना - मराठवाड्याच्या विकासावर राज्य सरकारचा फ़ोकस आहे. त्यामुळेच मराठवाड्यात नवीन प्रकल्प दिले आहेत. परिणामी मराठवाड्याचा विकास होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालना येथे केले. रसायन तंत्रज्ञान संस्था उपकेंद्रचे जालना येथील सिरसवाडी येथे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.4) भूमिपूजन झाले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, कुलगुरु जी. डी. यादव आदींची उपस्थिती होती.

यावेळी श्री.फडणवीस म्हणाले की, रसायन तंत्रज्ञान संस्था उपकेंद्रामुळे जालन्यात उद्योग क्षेत्रासाठी मानव संसादन निर्मिती होईल. ही संस्था उद्योजक निर्माण करणारी आहे. मराठवाड्यातील जालन्यात ड्रायपोर्ट, सीडपार्क, रसायन तंत्रज्ञान संस्था उपकेंद्र, समृद्धी मार्ग, औरंगाबाद येथे डीएमआयसी, लातूर येथे रेल्वे कोच कारखाना दिला आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षात जालना आणि औरंगाबादसह मराठवाड्याचा कायापालट होईल. मराठवाड्याच्या विकासासाठी राज्य सरकारने फोकस केले आहे, असे ही श्री. फडणवीस म्हणाले.

Web Title: State Government's focus on the development of Marathwada - Chief Minister