यशदा समितीची किनगाव येथे राज्यस्तरीय बैठक

fulmbri.jpg
fulmbri.jpg

फुलंब्री : तालुक्यातील किनगाव येथे आदर्श गाव योजनेअंतर्गत झालेल्या जलसंधारण, मंगल कार्यालय, बंदिस्त गटार, ग्रामसचिवालय आदी विविध विकासकामांची पाहणी करून महाराष्ट्र शासनाच्यायशदा समितीची ग्रामीण भागात प्रथमच किनगाव येथे शनिवारी (ता.दोन) रोजी राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली.

या बैठकीसाठी यशदा पुणेचे महासंचालक आनंद लिमये, रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी मुंबई महासंचालक रवींद्र साठे, आदर्शगाव संकल्प व प्रकल्प पुणेचे कार्याध्यक्ष पोपटरावजी पवार, यशदा पुणेचे अधिष्ठाता भारत भूषण, यशदा पुणेचे वित्तीय सल्लागार सतीश तडकसे, सार्वजनिक बांधकामविभागाचे अधीक्षक अभियंता अतुलजी चव्हाण, यशदा पुणेचे निबंधक सदाशिव पाटील, जिल्हा परिषद सदस्य अनुराधाताई चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती
होती.

सुरवातीला आदर्श गाव योजनेंतर्गत गावाला एकूण 88 लाख रुपयाचा निधी प्राप्त झाला होता. त्यामध्ये डीप सीसीटी, बांध बंधीस्ती, अनघड दगडी बांध, माती बांध, गॅबीअन बंधारे, सिमेंट बंधारे, शॉपिंगकॉम्प्लेक्स, मंगल कार्यालय, बंधिस्त गटार, सांस्कृतिक रंगमंच, दोन स्मशान भूमीसाठी तार कंपाऊड आदी विविध कामांसाठी सुमारे 85 लाख 18 हजार रुपये खर्च करण्यात आले. या सर्व कामांची या समितीने पाहणी करून समाधानव्यक्त केले.

यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधतांना रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी मुंबई महासंचालक रवींद्र साठे म्हणाले कि,  ''गावाच्या विकास कामांमध्ये जन भागीदारी आवश्यक असून नागरिकांनी आपली भूमिका, कर्तव्य,जबाबदारी ओळखली पाहिजे. तसेच गावाच्या विकासासाठी युवकांचा सहभागही महत्वाचा आहे. गावातील प्रत्येकाने संगणक साक्षर होणे गरजेचे असून केलेल्या कामाचे डाक्यूमेंटेशन होणे गरजेचे असल्याचे सांगितले.

यशदाचे महासंचालक आनंद लिमये म्हणाले कि, ''यशदा हि राज्याची शिखर प्रशिक्षण संस्था आहे. अधिकाऱ्यांना अभ्यासाची सवय लागावी व अधिकारी अद्यावत होण्यासाठी यशदा प्रशिक्षणाचे काम करते. यशदामध्ये जलसाक्षरता केंद्र सुरु केलेले असून गावामध्ये निवडलेल्या जलसेवकास यशदामार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यापुढे सरपंचानाही जलसाक्षर प्रशिक्षण देण्यात येणार आहे''

याप्रसंगी सरपंच पांडुरंग नजन, उपसरपंच कल्याण चव्हाण, तेजराव चव्हाण, ग्रामसेवक अरुण चित्ते, देवनाथ सोनवणे, सजनबाबा चव्हाण, विश्वास चव्हाण, सुभाष सोनवणे, कल्याण सोनवणे, आशाताई सोनवणे, निर्मलाताई चव्हाण, सखुबाई पवार, विनोद सोनवणे, किशोर चव्हाण, अप्पासाहेब देवकर, सुधाकर तावडे, प्रशांत चव्हाण, आबासाहेब चव्हाण, रामनाथ सोनवणे आदीं ग्रामस्थांची मोठ्या संखेने उपस्थिती होती.

25 गावांचे मूल्यमापन करणार - पोपटराव पवार
आदर्श गाव योजनेंतर्गत असलेल्या शंभर गावांपैकी चांगले काम झालेल्या 25 गावांचे मूल्यमापन पुणे येथील गोखले संस्थेमार्फत करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामध्ये सामाजिक व आर्थिक बदलाची माहिती घेण्यात येणार आहे. तसेच यावेळी गावात काम करीत असतांनाचे अनुभव पोपटराव पवार यांनी ग्रामस्थांना सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com