राज्यमार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे | State Route Work | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यमार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे
राज्यमार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे

राज्यमार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे

हेर - आष्टामोड ते उदगीर रस्त्याचे काम चालू आहे. परंतु, काम संपण्यापूर्वीच करडखेल ते नरसिंगवाडी या ठिकाणी जे काम झाले त्या रस्त्याला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत संशय निर्माण झाला आहे. आताच रस्ता खराब होत असून, पावसाळ्यात तर त्याची मोठी दुरवस्था होईल, अशी चर्चाही नागरिक करीत आहेत.

नरसिंगवाडी पाटीदरम्यान रस्त्यावर दगड गोटे भरून वरून सिमेंटाचा थर दिला होता. परंतु, त्यावरून काही वाहने गेल्यानंतर लगेच रस्ता उखडला. तेव्हा दगड गोटे भरून केलेला रस्ता उखडल्याने त्यावरचे सिमेंट काढून रस्त्याच्या कडेला टाकण्यात आले व नवीन रस्ता तयार करण्यात आला. तोसुद्धा अतिशय निकृष्ट दर्जाचा झाल्याचे दिसून येत आहे. रस्त्याला चिरा व भेगा पडत असल्याचे दिसत आहे; तसेच रस्त्याच्या कामात सळईचा वापर अजिबात झालेला नाही.

हेही वाचा: Latur : निलंग्यात राज्य शासनाची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून निषेध

रस्त्याच्या बाजूला दीड फुटाचे सळईचे तुकडे करून रस्त्याच्या बाजूला खुपसण्यात आलेले आहेत. एका बाजूपासून दुसऱ्या बाजूपर्यंत अखंड सळई वापरलेली नाही. रस्त्यावर पाणी मारले जात नाही. त्यामुळे वाहन चालवताना धुरळा उडत आहे. याचा त्रास प्रवाशांना होत आहे. या रस्त्याचे काम अतिशय संथ चालू आहे. या कामासाठी सिमेंट अतिशय निकृष्ट दर्जाचे वापरले जात असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

loading image
go to top