स्पीडमधील एसटी बसचा ब्रेक अचानक फेल आणि...

उमेश वाघमारे
Thursday, 31 December 2020

शहरातील कैन्हय्यानगर परिसरात बसचे ब्रेक फेल झाल्याने गुरूवारी सकाळी अपघात झाला.

जालना: शहरातील कैन्हय्यानगर परिसरात बसचे ब्रेक फेल झाल्याने गुरूवारी सकाळी अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणीही ही जखमी झाले नाही. औरंगाबाद येथून रिसोडकडे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची बस प्रवासी घेऊ निघाली होती. शहरातील कैन्हय्यानगर येथे बस आल्यानंतर बसचे ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. चालकाने बस रस्त्याच्या खाली घेत सुरक्षा भिंतीवर बस आदळली.

सुदैवाने या अपघातामध्ये कोणी ही जखमी झाले नाही. या  बसमध्ये सुमारे दहा प्रवाशी होते, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान या अपघातामुळे येथील कारखान्यात सुरक्षा भिंतीसह इतर साहित्याचे नुकसान झाले आहे. तसेच बसचे नुकसान झाले आहे.

शेवटच्या क्षणापर्यंत आतुरता; लातूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीला रंग

सुदैवाने या घटनेत कुठलीच जीवितहानी झालेली नाही. या अपघातात बस आणि गोदमाचं मोठं नुकसान झालं आहे. तिथल्या स्थानिक नागरिकांनी प्रवाशांना बसमधून सुखरूप बाहेर काढलं. घटनेची माहिती मिळताच चंदनजीरा पोलीस घटनास्थळी पोहोचले होते.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: state transport bus break failed aurangabad jalna