देशासाठी व कुटुंबासाठी घरात बसा- रवि सोनवणे

फोटो
फोटो

नांदेड : जो संकटाला देखील संधी मानून जगतो, तोच आयुष्यात यशस्वी ठरतो ! या संकटरूपाने देखील संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणून मुलांचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी खूप मोठी संधी उपलब्ध करुन दिली आहे. गेलेला पैसा, गेलेले वैभव पुन्हा मिळवता येऊ शकते, परंतु गेलेला क्षण पुन्हा आणू शकत नाही. त्यामुळे या क्षणाचा आपण आपल्या मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे. समस्त मानवजातीच्या हितासाठी, देशासाठी व आपल्या कुटुंबासाठी पुढील काही काळ घरात बसण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे मत प्रतिभा निकेतनचे सहशिक्षक रवि सोनवणे यांनी व्यक्त केले आहे.  

हे युग स्पर्धेचे युग आहे

या काळात आपण आपल्या मुलांना चांगल्या सवयी लावण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. कारण प्रत्येक माणूस हा सवयीचा गुलाम असतो तर मग आपण आपल्या मुलांना चांगल्या सवयींचा गुलाम बनवण्यासाठी प्रयत्न करू या ! आरोग्याच्या, स्वच्छतेच्या सवयी सोबतच स्वतःहून अभ्यास करण्याची सवय लावणे ही आजच्या काळाची गरज आहे. हे युग स्पर्धेचे युग आहे, अन् या स्पर्धेत स्वतःहून अभ्यास करणाराच टिकणार आहे. त्यासाठी घरी बसल्या बसल्या स्पर्धा परीक्षेतील बुद्धीमत्तेचे प्रश्न विचारून त्यांची चिकित्सकव्रुत्ती वाढवली पाहिजे, गणिताच्या मूळसंकल्पना समजावून गणिताविषयी भीती दूर केली पाहिजे.

सामान्यज्ञानासोबतच व्यवहारी ज्ञानाची जान करून दिली पाहिजे

नकाशातील गावांच्या भेंड्या खेळत खेळत नकाशावाचनाची सवय लावली पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांना पुस्तकातील सर्व प्रश्नांची उत्तरे येतात परंतु आपल्या अवतीभोवतीचे अगदी सामान्यज्ञान किंवा व्यवहारी ज्ञान नसते. त्यासाठी सामान्यज्ञानासोबतच व्यवहारी ज्ञानाची जान करून दिली पाहिजे. मोबाईलमुळे मुलांच्या मानसिकतेवर खुप विपरित ताण पडत आहे. त्यामुळे त्यांच्या हातातील मोबाईल काढून त्यांना चेस, कँरम, पैशांचा व्यवहार, शब्दकोडे या बैठे खेळाकडे वळवण्यासाठी स्वतः त्यांच्यासोबत खेळले पाहिजे. त्याचबरोबर त्यांच्यात असणाऱ्या सूप्तगुणांना वाव दिला पाहिजे. जसे चित्रकला, न्रुत्यकला, गायन, भाषण, लेखन यांच्याकडेही परिस्थिती व कलनुसार लक्ष दिले पाहिजे.
 
टाकाऊ वस्तुंपासून वेगवेगळ्या शोभेच्या व उपयोगात येणाऱ्या वस्तू बनवा

मुलींसाठी रांगोळी, मेहंदी ,स्वयंपाकातील छोटे- मोठे काम करवून घेतले पाहिजे. घरात असणाऱ्या टाकाऊ वस्तुंपासून वेगवेगळ्या शोभेच्या व उपयोगात येणाऱ्या वस्तू बनविण्यासाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन केले पाहिजे. त्यामुळे त्यांच्यातील सृजनशिलतेला वाव मिळतो. जसे- पेनकेस, रिकाम्या आगपेपटींच्या डब्यांपासून घर, आगगाडी हे व असे अनेक वस्तू, उपक्रम, प्रकल्प करता येऊ शकतात. त्यामुळे मुलांना देखील वेगवेगळ्या कामाचा अनुभव येईल व पालकांना देखील खूप आनंद मिळेल.

विधायक कार्यासाठी नियोजनबद्ध उपयोग करून घ्या

लहान मुलांपासून ते जेष्ठांपर्यंत सर्वांच्याच व्यस्त दिनचर्येतून एकत्र येण्याची संधी मिळाली त्याचा आपण विधायक कार्यासाठी नियोजनबद्ध उपयोग करून घेतला पाहिजे. जसे आपण आपला बगीचा सुंदर दिसावा म्हणून अनावश्यक गोष्टी दूर करतो व अवश्यक गोष्टींना खतपाणी घालतो त्याचप्रमाणे आपला पाल्य आयुष्यात यशस्वी व्हावा यासाठी अनावश्यक वाईट सवयी दूर करून चांगल्या सवयी/गुणांना खतपाणी घालून त्याचे आयुष्य सुंदर व यशस्वी कसे बनेल व त्याचा सर्वांगिण विकास कसा साधता येईल यासाठी सतत हसत खेळत व पाल्यांना नकळतपणे प्रयत्न केले पाहिजे...!

जगावर कोसळलेले दिर्घकालीन महासंकट

प्रत्येक देशावर कधीतरी, कोणत्यातरी रूपाने काही काळासाठी का होईना महासंकट येते व आपल्या क्षमतेनुसार तो देश त्या संकटावर मात करतो. परंतु सध्या आलेले कोरोनाचे हे संकट कोण्या एका देशावर नव्हे तर अख्ख्या जगावर कोसळलेले दिर्घकालीन महासंकट आहे. आजच्या कोणत्याही पिढीने असे संकट व अशाप्रकारचे दिर्घकालीन लॉकडाउनचा अनुभव घेतला नसेल. साहजिकच एवढा दिर्घकाळ घरात बसून राहणे खूप मोठी कसोटी आहे. सुट्ट्या आहेत म्हणून आपल्या मुलांना मामा, काका, आत्या कोणाकडेही पाठवता येत नाही किंवा परिवारासह कोठेही भ्रमंती करता येत नाही.
                    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com