esakal | पोलिसांच्या सुदृढ आरोग्यासाठी अष्टसूत्री 
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित चित्र.

पोलिसांच्या सुदृढ आरोग्यासाठी अष्टसूत्रीचा अवलंब केला जाणार आहे, तशा सूचना पोलिस अधीक्षक चैतन्य एस. यांनी दिल्या आहेत. यात आहार, प्राणायाम, आरोग्यविषयक काळजी आदी बाबींचा समावेश आहे. 

पोलिसांच्या सुदृढ आरोग्यासाठी अष्टसूत्री 

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आयुष मंत्रालयाच्या निर्देशाप्रमाणे पोलिसांच्या सुदृढ आरोग्यासाठी अष्टसूत्रीचा अवलंब केला जाणार आहे, तशा सूचना पोलिस अधीक्षक चैतन्य एस. यांनी दिल्या आहेत. यात आहार, प्राणायाम, आरोग्यविषयक काळजी आदी बाबींचा समावेश आहे. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन ता. तीन मेपर्यंत वाढविण्यात आले आहे; मात्र या लॉकडाऊनचे पालन करण्यासाठी पोलिस चोवीस तास रस्त्यावर उभे आहेत. त्यामुळे पोलिसांनी आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या आठ निर्देशांचा अंमल करावा, अशा सूचना चैतन्य एस. यांनी दिल्या.

हेही वाचा : जालन्याच्या इतिहासात प्रथमच स्टील उद्योग बंद

त्यानुसार, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा एक भाग म्हणून पोलिसांनी दिवसभर कोमट पाणी पिणे, किमान ३० मिनिटे योगासने, प्राणायाम, ध्यान, चिंतन करावे. दररोज जेवणामध्ये हळद, जिरे, कोथिंबीर, लसूण यांचा वापर करावा. आयुर्वेदिक चहा किंवा तुळशीची पाने, दालचिनी, काळे मिरे, सुंठ आणि मनुका यांचा वापर करीत दिवसातून एकदा किंवा दोनवेळा चावीनुसार लिंबाचा रस टाकून चहा प्यावा, १५० मिलिलिटर गरम दुधामध्ये अर्धा चमचा हळद टाकून प्यावी.

हेही वाचा : द्राक्षे लगडली; पण विकावी कोठे?

सकाळी, संध्याकाळी तिळाचे व नारळाचे एक चमचा तेल एक ते दोन मिनिटे तोंडात ठेवून ते थुंकून टाकावे. गरम पाण्याने तोंड धुवावे, कोरडा खोकला असेल तर ताजी पुदिन्याची पाने व ओवा यांची वाफ घ्यावी, घसा दुखत असेल तर लवंगाची पावडर मधात टाकून दिवसातून एक किंवा दोन वेळा घ्यावी, असेही या पत्रात नमूद केले आहे. 
 

loading image