Jalna News : ग्रामीण भागात शेअर मार्केटची क्रेझ ; तरुणांंकडून गुंतवणुकीसह ट्रेडिंग जोरात

सध्या परतूर येथील तरूणांत शेअर मार्केटबाबत सकारात्मक विचार रुजत आहे. दरम्यान, तालुक्यातील अनेक युवक शेअरमधून पैसे कमावत आहे. यामुळे तरूणांना रोजगार उपलब्ध होत आहे.
jalna
jalna sakal

परतूर : शहरासह ग्रामीण भागातील तरूणांत शेअर मार्केटची क्रेझ पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे परतूर तालुक्यातील अनेक तरूण मार्केटमध्ये गुंतवणूक व ट्रेडिंग करीत आहेत. कोरोना संसर्गामुळे या काळात अनेक तरूण बहुतांश वेळ घरीच होते. शिवाय इंटरनेट व स्मार्टफोन आदी सुविधा या कमी दरात उपलब्ध असल्यामुळे अनेकांनी या कसोटीच्या काळात शेअर मार्केटचे ऑनलाइन क्लासेस तसेच सोशल साइट्सच्या माध्यमातून विविध ग्रुपच्या माध्यमातून शेअर मार्केटची माहिती मिळवली व त्यात व्यवहार सुरू केले.

शेअर बाजारात रस घेणाऱ्यांमध्ये तरूण डॉक्टर, वकील, नोकरदार वर्गाचा आहे. त्यातही प्रामुख्याने शिक्षक, खासगी कर्मचारी, व्यापारी यात गुंतवणूक तसेच ट्रेडिंग करताना दिसून येत आहेत. सध्या परतूर येथील तरूणांत शेअर मार्केटबाबत सकारात्मक विचार रुजत आहे. दरम्यान, तालुक्यातील अनेक युवक शेअरमधून पैसे कमावत आहे. यामुळे तरूणांना रोजगार उपलब्ध होत आहे.

लॅपटॉप, मोबाईलवर ट्रेडिंग

तालुक्यातील अनेक तरूण लॅपटॉप आणि मोबाईलवर ट्रेडिंग करीत आहेत. अनेक जण ऑनलाइन क्लास करून चांगल्या पद्धतीने दर दिवस ट्रेडिंग करीत आहेत. अनेक तरूण विविध कार्यक्रमांत, लग्न समारंभात एकत्र आल्यावर शेअर मार्केटमधील नफा-नुकसान, कंपनीची स्थिती, कुठला शेअर वर-खाली गेला याची चर्चा करताना दिसून येत आहेत. ग्रामीण भागातही अनेक जण कट्ट्यांवर शेअर मार्केटबद्दल चर्चा करताना दिसून येत आहेत.

शेअर मार्केटचा चांगला अभ्यास करून गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळतो. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये कमी गुंतवणूक करून जास्त पैसे कमी वेळात मिळवता येतात. सोशलमीडियाच्या माध्यमातून अनेक तरुणांना याविषयी मार्गदर्शन केले जात आहे.

— राजू उबाळे,

तरूण, परतूर

मी गेल्या अनेक वर्षांपासून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतो. भविष्याच्या दृष्टीने गुंतवणूक म्हणून चांगल्या कंपन्यांचे शेअर्स मी घेऊन ठेवले आहेत. त्यात मला चांगला नफा मिळाला आहे.

मी गेल्या अनेक वर्षांपासून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतो. भविष्याच्या दृष्टीने गुंतवणूक म्हणून चांगल्या कंपन्यांचे शेअर्स मी घेऊन ठेवले आहेत. त्यात मला चांगला नफा मिळाला आहे.

— मनोज माटोले,

उद्योजक, परतूर

वाढती बेरोजगारी लक्षात घेता युवकांनी रोजगार उपलब्ध करण्यासाठी शेअर मार्केट हा चांगला पर्याय उपलब्ध आहे. अभ्यासपूर्ण ट्रेडिंग केल्यास चांगला नफा मिळू शकतो. यातून घराला हातभार लागेल.

— हरी काळे,

अभ्यासक, परतूर

ग्रामीण व शहरी भागातील अनेक तरुण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करीत आहेत. अर्थात शेअर मार्केट धोकादायक देखील आहे. युवकांनी जास्तीच्या आमिषाला बळी पडू नये. स्वतः अभ्यास करून ट्रेडिंग करावी.

— पवन देशमुख,

नागरिक, परतूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com