देवगांव रंगारी येथे एटीएम यंत्र फोडून सात लाखांची चोरी      

संतोष गंगवाल
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

येथील बसस्थानकासमोर गजबजलेल्या ठिकाणी खासगी कंपनीने सात बाय दहाच्या खोलीत एटीएम यंत्र बसविलेले आहे. शनिवारी (ता. 13) रात्री अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करुन गँसकटरच्या साहाय्याने यंत्र फोडले असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

देवगांव रंगारी : देवगांव रंगारी (ता. कन्नड, जि. औरंगाबाद) येथील बसस्थानक परिसरात मध्यवर्ती ठिकाणी असलेले खासगी कंपनीचे एटीएम यंत्र अज्ञात चोरट्यांनी फोडुन त्यात असलेले सुमारे सात लाख रुपये चोरुन नेल्याची घटना रविवारी (ता. 14) सकाळी उघडकीस आली.या घटनामुळे ग्रामस्थांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

येथील बसस्थानकासमोर गजबजलेल्या ठिकाणी खासगी कंपनीने सात बाय दहाच्या खोलीत एटीएम यंत्र बसविलेले आहे. शनिवारी (ता. 13) रात्री अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करुन गँसकटरच्या साहाय्याने यंत्र फोडले असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. कारण घटनास्थळी पाचशे व शंभर रुपयाच्या काही नोटा अर्धवट जळाल्याच्या अवस्थेत आढळुन आल्या.तिथे असलेल्या सीसीटिव्हीच्या कॅमेराची नासधुस करण्यात आली आहे.
घटनेची माहीती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक स्वप्ना शहापुरकर, स्थानीक जिल्हा गुन्हा अन्वेषण विभागाचे परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक पांडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक सुभाष भुजंग , भगतसिंग दुलत गणेश जाधव, रतन वारे, नवनाथ कोल्हे, विक्रम देशमुख, आशिष जमधडे, रमेश अप्सनवाड, रामेश्वर धापसे यांनी भेट दिली.

सुरक्षा वाऱ्यावर...         
येथे दोन खासगी कंपनीचे एटीएम यंत्र आहे. परंतु दोन्ही ठिकाणी सुरक्षारक्षक नेमलेले नाही. याच केंद्रावर दीड वर्षापुर्वी ही चोरी झाली होती. त्यानंतरही कंपनीने सुरक्षेच्या दृष्टीने पाऊले उचलली नाही. त्यांचा या हलगर्जीपणामुळे चोरटे यशस्वी झाले आहे.

Web Title: Stolen seven lakhs from ATM devices at Devgaon Rangari