क्लासचालक खून प्रकरण, लातुरात सुरु आहे 'शिक्षण बंद'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

लातूर : 'स्टेप बाय स्टेप'चे संचालक अविनाश चव्हाण यांच्या खून प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, शिक्षण क्षेत्रातील गुंडगिरी थांबवा या मागणीसाठी लातुरात आज 'शैक्षणिक बंद' पुकारण्यात आला आहे. या बंदमध्ये शहरातील जवळजवळ सर्वच शाळा, महाविद्यालये, क्लासेस सहभागी झाले आहेत. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात शुकशुकाट पहायला मिळत आहे.

चव्हाण यांचा आठडाभरापूर्वी लातुरात गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या घटनेचा निषेध करत आम्ही लातूरकर यांच्या वतीने बंद पुकारण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी जलदगती न्यायालयामार्फत करुन जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी लातूरकरांच्या वतीने करण्यात आली आहे. तसे निवेदनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यातण्यात आले आहे.  

शिक्षणक्षेत्रातील गुंडगीरी थांबवून शाळा, महाविद्यालयासह खासगी कोचिंग क्लासेस चालविणार्‍या संचालक, संस्थावर नियंत्रण लागू करावे, विद्यार्थ्यासाठी केवळ नाममात्र प्रवेश देणार्‍या महाविद्यालयाची मान्यता रद्द करा, मुला-मुलींचे तंत्रनिकेतन विद्यालय पूर्ववत ठेवून शासनमान्य अभियांत्रिकी महाविद्यालय स्वतंत्रपणे सुरु करा, खासगी शिकवणी वर्ग नियंत्रित करणारा कायदा पावसाळी अधिवेशनात पारीत करा अशा विविध मागण्याही करण्यात आल्या आहेत.

Web Title: stop the education in latur for murder of coaching class owner