ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा परभणी जिल्ह्यात रास्ता रोको

गणेश पांडे 
Saturday, 28 November 2020

गंगाखेड शुगर्सला गाळपाची परवानगी देण्यात यावी, यासाठी आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली रासप व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने शनिवारी गंगाखेडला रास्ता रोको करण्यात आला. तसेच पालम येथे गंगाखेड शुगर कारखान्यास गाळप परवाना द्यावा, या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन शेतकऱ्यांनी केले. 

गंगाखेड ः गंगाखेड शुगर्सचे क्रेशिंगचे लायसन रद्द करत यावर्षी गाळपाची परवानगी नाकारली. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी गंगाखेड शुगर्सला गाळपाची परवानगी द्यावी, यासाठी आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली रासप व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने परळी नाका येथे शनिवारी (ता.२८) रास्ता रोको करण्यात आला. 

परिसरातील शेतकऱ्यांनी ३० हजार हेक्‍टरवर ऊसाची लागवड केली. सद्यस्थितीत २१ लक्ष मे.टन ऊस उभा आहे. जिल्ह्यातील इतर कारखान्यांची गाळप क्षमता कमी असल्यामुळे सात लक्ष मेट्रिक टन ऊस उभाच राहणार असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. गंगाखेड शुगर्सला गाळप करण्याची परवानगी देण्यात यावी, यासाठी परळी नाका येथील महाराणा प्रताप चौकामध्ये रस्त्यावर ऊसाच्या मुळ्या टाकून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी रासपचे प्रदेश सरचिटणीस सुरेश बंडगर, किसन भोसले, ॲड.संदिप आळनूरे, सत्यपाल साळवे, राधाकिसन शिंदे, राजेश फड, सतीश घोबाळे, इंतेसार सिद्दिकी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. 

हेही वाचा - हिंगोली शहरात दोन गटात हाणामारी, ४१ जणावर गुन्हे दाखल

पालमला दोन तास वाहतूक ठप्प 
पालम ः गंगाखेड शुगर अन्ड एनर्जी कारखान्याला गाळप परवाना द्यावा या मागणीसाठी पालम येथे शनिवारी (ता.२८) शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनामुळे लोहा-गंगाखेड रस्त्यावर दोन तास वाहतूक ठप्प झाली तर शहाराच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगच रांगा दिसून येत होत्या. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत त्यांच्यावर पालम पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले. आंदोलनादरम्यान पोलिस निरीक्षक दीपक शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन इंगेवाड, फौजदार सहाने यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.आंदोलनात माधवराव गायकवाड, बाळासाहेब कुरे, नारायण दुधाटे, शेख गौस, असदखाँ पठाण, दतराव घोरपडे, आजीम पठाण, गफार कुरेशी, ऊबेदखाँ पठाण, ताहेरखा पठाण, बाबासाहेब एंगडे, शेख शौकत, गणेशराव घोरपडे, विजयराजे शिंदे, राजु सीरसकर, राहुल शिंदे, विनायक पौळ, भगवान सीरसकर, बाळासाहेब कराळे, मारोती शेंगुळे, गणेशराव दुधाटे, शेख बशीर, अतुल धुळगुंडे, प्रताप पौळ, माधव नंदेवार, गंगाधर वावळे, वेजनाथ हांडे, माधव जगताप, भारत डोणे, गंगाधर डुकरे, डुकरे कृष्णा, नागोराव काकडे, राहूल शिंदे, भारत शिंदे, जयप्रकाश हानवते, गजानन भस्के, दत्ता पवार, कंठीराम कौशल्ये, सयद सुभाण, रहीमतुला खान, कुरेशी गौस, मारोती शेंगुळे, गंगाधर वावळे, नामदेव कुरे, पिरखान पठाण, मोहसीन पठाण, चंद्रकांत गायकवाड सहभागी झाले होते. 

हेही वाचा - नांदेड : बनावट रासायनिक खत शेतकऱ्यांच्या माथी, गुन्हा दाखल

परवाना न दिल्यास आणखी तीव्र आंदोलन 
गंगाखेड शुगरचा परवाना रद्द केल्याच्या निषेधार्थ ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी २७ नोव्हेंबर रोजी पालम तहसीलसमोर निदर्शने केली. तर दुसऱ्या दिवशी पालम शहरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वरही सरकारने गाळप परवाना न दिल्यास शेतकरी आणखी तीव्र आंदोलन करतील असा इशारा आमदार रत्नाकर गुट्टे मित्र मंडळाचे पालम-पूर्णा प्रभारी माधवराव गायकवाड यांनी दिला. 

 

 
संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stop the road of sugarcane growers in Parbhani district, Parbhani News