उमरग्‍याला तडाखा; शंभर घरांवरील पत्रे उडाले, विजेचे चाळीस खांब कोसळले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

उमरगा - शहरासह तालुक्‍यात वादळी वाऱ्यासह रविवारी (ता. तीन) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. वादळी वाऱ्यामुळे बलसूर, बलसूर तांडा व कडदोरा, कलदेव लिंबाळा आदी गावांतील सुमारे शंभर घरांवरील पत्रे उडाले आहेत. काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. जवळपास विजेचे ४० खांब जमीनदोस्त झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. दरम्यान, बलसूर येथे उडालेल्या पत्र्याचा मार लागल्याने एक म्हैस, शेळीची दोन पिले दगावली, तर तीन नागरिक जखमी झाले आहेत.

शहरासह तालुक्‍यात रविवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली. बलसूर, कडदोरा, बलसूरतांडा, कलदेवलिंबाळा परिसरात पावसाचा जोर जास्त असल्याने सर्वत्र पाणी साचले होते. वादळी वाऱ्यामुळे अनेक गावांतील विद्युत खांब कोसळले; तर चक्री वादळत बलसूर येथील घरांवरील पत्रे उडाल्याने अयुब शेख यांच्या मालकीची म्हैस पत्रा लागून दगावली; तर बलसूरतांडा येथील गोविंद मनू राठोड यांच्या मालकीच्या शेळीची दोन पिले दगावली आहेत. तर, दिव्यांग रावण पवार व राजेंद्र सखाराम चव्हाण हे दोघे पत्रा लागून जखमी झाले. तुगाव येथील विलास भोजा राठोड बलसूरतांडा येथे अंत्यविधीसाठी आले होते. वादळी वाऱ्यात सापडल्याने पत्रा लागून ते जखमी झाले आहेत.

बलसूर येथे झालेल्या वादळात रस्त्यावर थांबलेल्या दुचाक्‍या अक्षरशः दहा फुट फरफटत जात होत्या. कडदोरा येथे अंकुशराव बालकुंदे याच्या घरासमोरील झाड उन्मळून पडले. उमाजी रणखांब व विश्वनाथ आष्टे यांच्या घराची पडझड झाली आहे. तर, केशरबाई अशोक रणखांब, गोरख  भिवाजी रणखांब, गोविंद केशव रणखांब, भारतबाई मदने, त्र्यंबक रणखांब, मनोहर सास्तुरे आदींच्या घरावरील पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले. प्रशासनाने नुकसानीचा तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची गरज असल्याचे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी सांगितले.

Web Title: storm rain in umaraga loss