मका पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

माळेगाव ठोकळ (ता.कन्नड) परिसरातील मका पिकावर दुर्मिळ करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे जवळपास सत्तर टक्के मक्‍याचे पीक वाया जाऊन केवळ चारा शिल्लक हातात राहणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मका पीकविषयक कृषितज्ज्ञ डॉ.एस.बी.पवार, डॉ.जगताप, डॉ.त्रिपाठी, उपविभागीय कृषी अधिकारी पी.आर.चव्हाण, तालुका कृषी अधिकारी शुकलेश्वर पेंडभाजे, कृषी मंडळ अधिकारी जाधव, प्रवीण सरकलवाड यांच्यासह तालुक्‍यातील शेती साहित्य विक्रते यांनी गुरुवारी (ता.तीन) परिसरातील करपा रोगबाधित मका पिकाची पाहणी करून पिकांचा पंचनामा केला.

पिशोर  (जि.औरंगाबाद) : माळेगाव ठोकळ (ता.कन्नड) परिसरातील मका पिकावर दुर्मिळ करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे जवळपास सत्तर टक्के मक्‍याचे पीक वाया जाऊन केवळ चारा शिल्लक हातात राहणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मका पीकविषयक कृषितज्ज्ञ डॉ.एस.बी.पवार, डॉ.जगताप, डॉ.त्रिपाठी, उपविभागीय कृषी अधिकारी पी.आर.चव्हाण, तालुका कृषी अधिकारी शुकलेश्वर पेंडभाजे, कृषी मंडळ अधिकारी जाधव, प्रवीण सरकलवाड यांच्यासह तालुक्‍यातील शेती साहित्य विक्रते यांनी गुरुवारी (ता.तीन) परिसरातील करपा रोगबाधित मका पिकाची पाहणी करून पिकांचा पंचनामा केला. येथील शेतकरी कायम दुष्काळाच्या समस्येला सामोरा जात असतो. त्यात आता मक्‍याच्या कणसात दाणेच नसल्याने तो दुहेरी संकटात सापडला आहे.

येथील शेतकऱ्यांनी मका पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. लागवड केल्यानंतर मका पिकांची वाढ चांगल्या प्रमाणात झाली. मकाला कणीस तर लागले; परंतु त्या कणसात दाणेच भरले नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे खरिपाचा पेरणी खर्च आणि पीक पूर्ण वाया गेले आहे. येथील जमीन माळरानावर असल्याने वर्षातून एकच पीक घेता येते. लष्करी अळीचा प्रादुर्भाव कसाबसा थोपवल्यानंतर लहरी करप्याने हल्ला केल्याने बळिराजा पूर्णतः हतबल झाला आहे. कृषी विभागाकडून संबंधित पिकांचा पंचनामा करण्यात आला असून, तात्काळ पीकविमा मंजूर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा विधानसभा मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा पवित्रा घेणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी मका पिकाचे शास्त्रज्ञ डॉ.एस.बी.पवार, डॉ.जगताप, डॉ.त्रिपाठी, उपविभागीय कृषी अधिकारी पी.आर.चव्हाण, तालुका कृषी अधिकारी शुकलेश्वर पेंडभाजे, कृषी मंडळ अधिकारी जाधव, प्रवीण सरकलवाड, कृषी पर्यवेक्षक ज्योती पाटील, उपसरपंच प्रभाकर ठोकळ यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Story About Cron Crop Disease