Shweta Patil and Vijaysinh Deshmukh
sakal
देगलूर (जिल्हा नांदेड) - नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (ता. १६) अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. बँकेवर येण्यासाठी इच्छुक असलेले माजी सभापती शिवाजीराव देशमुख बळेगावकर यांनी सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून भरलेला उमेदवारी अर्ज छाननी मध्ये बाद झाला होता.