Raksha Khadse: व्हिसा, पासपोर्ट आणि एअरलाइनच्या अडचणींना पार करत महाजन कुटुंब भारतात; केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी केली मदत
Indian Rescue Mission: पॅरिस विमानतळावर अडकलेल्या महाजन कुटुंबीयांनी अनेक तासांनंतर भारतात सुखरूप आगमन केले. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या तत्पर मदतीने ही शक्य झाले.
भोकरदन (जि.जालना) : आजच्या काळात लहान मुलांसोबत परदेशी हवाई प्रवास जणू पालकांसाठी कठीण परीक्षाच झाली आहे.परदेशी हवाई कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे छत्रपती संभाजी नगर येथील महाजन कुटुंबीयांना चांगलाच मनस्ताप झाला.