
अंबड : जालना जिल्हयातील अंबड शहरातील बसस्थानकात दिवसरात्र मोकाट जनावरांचा वावर वाढत चालला आहे. यामुळे वाहतूक व्यवस्थेची नेहमीच कोंडी होत आहे. मोकाट जनावरे प्लॉट फार्म तसेच परिसरात मुक्तपणे संचार करत ठाण मांडून बसत आहे. यामुळे बसचालक व वाहक यांना प्लॉट फार्म वर बस लावण्यापूर्वी हातात काठी घेऊन जनावरांना रस्त्यातून हाकलून लावतानाचे चित्र पाहण्यासाठी मिळत आहे.मोकाट जनावरे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.शाळा, महविद्यालयात सकाळी व दुपारी सुटल्यानंतर विद्यार्थ्यांची एकच धांदल उडते.