उदंड जाहले कुत्रे!

उदंड जाहले कुत्रे!

औरंगाबाद - नसबंदीच्या अपुऱ्या सोयी, श्‍वानपथकाचा अभाव आणि त्यातच साचत असलेल्या कचऱ्यावर मनसोक्त खाण्याची सोय झाल्याने शहरभर मोकाट कुत्र्यांच्या सुळसुळाट झाला आहे. पाच वर्षांपूर्वीच्या २०१२ च्या पशुगणनेनुसार आधीच जिल्ह्यात पाळीव कुत्र्यांची संख्या २९ हजारांवर गेली असून त्यात आता मोकाट कुत्र्यांची भर पडली आहे. शहरातील कचराकोंडीमुळे मोकाट कुत्र्यांच्या संख्येत आणखीनच भर पडली आहे. विशेष म्हणजे, शहरात माद्यांपेक्षा नरांची चौपट, तर ग्रामीण भागात दुप्पट संख्या आहे.

प्राण्यांमध्ये कुत्रा हा इमानदार, स्वामीनिष्ठ मानला जातो. यामुळे शेतीची, घराची आणि पशुधनांची राखण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कुत्रे पाळले जातात. गाव शहराजवळच्या शेतांमध्ये उसाच्या फडात ऊस खाण्यासाठी येणारे कोल्हे आणि मानवी वस्तीत राहणाऱ्या कुत्र्यांमध्ये संघर्ष होऊन एखादा पिसाळलेला कोल्हा चावला तर कुत्रे किंवा त्यांची पिले पिसाळण्याची शक्‍यता असते आणि त्यातून इतरांना ते चावले तर रेबीजची लागण होण्याचा धोका वाढला आहे. २०१२ च्या पशुगणनेनुसार जिल्ह्यात कुत्र्यांची संख्या २९ हजार ७६३ इतकी आहे. त्यात ८ हजार ५२० माद्या, तर २१ हजार २४३ नर असल्याचे आढळले आहे. पाच वर्षांपूर्वीची ही संख्या असून यात आता आणखी वाढ झाली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

जिल्ह्यातील संख्या 
(स्रोत : २०१२ ची पशुगणना)
तालुका    नर    मादी
औरंगाबाद     ५४३४    १६९२
पैठण     २६२५    १००८
फुलंब्री     २२२६    ६३१
वैजापूर     ४०१६    २०५७
गंगापूर     १८६७    ८९६
कन्नड     ३४९२    १०५६
खुलताबाद     १८३९    ७१५
सिल्लोड     २७०४    ८४६
सोयगाव     ५९२    ५०७
औरंगाबाद शहर ४१५२    ८८८

कुत्री एकावेळी ८ ते १० पिलांना जन्म देते. महिन्याला सरासरी पाचशेची भर पडते. या आठ-दहांपैकी त्यांच्यात मृत्यूचेही प्रमाण मोठे असले, तरी ही वाढती संख्या गंभीरच आहे. कुत्र्यांची नसबंदी करण्याचे प्रमाण व केंद्र वाढले पाहिजेत. सतत कुत्रे पकडून नसबंदी करावी लागेल. घरगुती कुत्र्यांची, त्यांच्या पिलांची, जर पिले इतरांना दिली तर त्याची महापालिकेकडे सविस्तर नोंद असली पाहिजे.
- डॉ. अनिल भादेकर, पशुवैद्यक, श्‍वानतज्ज्ञ

 शहरात दहा महिन्यांत १३५० कुत्र्यांची नसबंदी
 महापालिकेचे श्‍वानपथक फक्‍त एक
 नसबंदी करण्यासाठी केवळ एकच केंद्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com