पाच दिवसाच्य़ा नवजात शिशुला जन्मदात्यांनी फेकले रस्त्यावर

योगेश पायघन 
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : जन्मदात्यांनी जिवंत पाच दिवसाच्या नवाजात शिशूला रस्त्याच्या कडेला सोडून पळ काढला. बीड बायपास रोडवरील जबिदा लान्स जवळ शुक्रवारी (ता 24) रात्री साडे अकराच्या सुमारास ही घटना स्थानिकांमुळे उघडकीस आली. पोलिस व समाजसेवी संस्थेच्या तत्परतेने हा चिमुकला घाटीत उपचार घेत आहे.

प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार lते बाळ बीड बायपास रोडवरील जबिदा लान्स जवळ येथे सापडल्याची माहिती स्थानिकांनी सातारा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ही माहिती पोलिसांनी चाईल्ड हेल्प लाईन 1098 ला दिली. त्यांनी तत्परतेने मदतीसाठी मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे पाचारण केले. या संस्थेचे आप्पासाहेब उगले व मिलिंद आकोलकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांच्या मदतीने बाळाला घाटी रुग्णालयात दाखल केले. घाटीच्या बालरोग विभागातील वार्ड 24 च्या परिचारिका व पथक दोन मधील डॉक्टर त्याची शश्रूषा करत आहे. पुढील तपास सातारा पोलिस करीत आहे. 

बाळ सुखरूप
''सुरुवातीला सापडल्यावर हे बाळ दोन दिवसांचा असल्याचा अंदाज होता. मात्र त्याची नाळ वाळून पडल्याने डॉक्टरांनी तो पाच दिवसांचा असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून लवकरच त्याला फिडिंग सुरू करू'', असे ही ते 'सकाळ' शी बोलतांना म्हणाले. ''सध्या मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे एकनाथ तगडे त्याची देखरेख करत आहे. लवकरच त्याला शिशुगृहात हलवण्याचा निर्णय होईल'', असे अप्पासाहेब उगले म्हणाले.

Web Title: In the streets thrown by the birth of five-year-old baby babies