Breaking News : बीड शहरात पुढील सात दिवस कडक लॉकडाऊन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 1 July 2020

जिल्हाधिकारी  राहुल रेखावर यांचा  निर्णय

एका कोरोनाबाधिताचा उपचारनिमित्त शहरात संपर्क. 

बीड : बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या तीन पैकी एका रुग्णाने बीड मधील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतला होता आणि त्या रुग्णालयाच्या माध्यमातून सदर रुग्णाचा अनेकांशी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष संपर्क आल्याने धोका वाढला आहे. त्यामुळे बीड शहर पुढील सात दिवसासाठी पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकार्‍यांनी घेतला आहे. बुधवारी रात्री उशीरा तसे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी काढले आहेत.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
 

बुधवारी बीड शहरात कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आले होते. यातील एका रुग्णाने बीडमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्याचे समोर आले. त्यामुळे सायंकाळनंतर आरोग्य विभाग कामाला लागला. या रुग्णालयाच्या माध्यमातून बीड शहरात अनेक जण प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सदर रुग्णाच्या संपर्कात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

यामुळे कोरोनाचा फैलाव अधिक होऊ नये यासाठी बीड शहर पुढील सात दिवसांसाठी संपूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी घेतला आहे. अनलॉक २ मधे कोरोनाची परिस्थिती लक्षात घेवून निर्णय घेण्याचे सर्वाधिकार राज्यशासनाने जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. त्यानूसार बीड शहरात सदरचा निर्णय घेण्यात आला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Strict lockdown in Beed for next seven days