
परभणी : नागरिकत्व कायद्याला विरोध करत मुस्लिम समाजाच्या वतीने शहरात शुक्रवारी (ता.२०) मोठा मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, मोर्चा सुरू होण्याआधी परभणी शहरातील बहुतांश बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.
नागरिकत्व कायद्याला मुस्लिम समाजातून मोठा विरोध होत आहे. हा कायदा तातडीने रद्द करावा, या मागणीसाठी देशभरात निदर्शने केली जात आहेत. शुक्रवारी (ता.२०) या कायद्याला विरोध करण्यासाठी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. शुक्रवारी सकाळपासून शहरातील मुख्य बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे शहरातील शिवाजीचौक, गांधीपार्क, सुभाष रोड, सरकारी दवाखाना परिसर, जनता मार्केट, क्रांती चौक, स्टेशन रोड परिसरातील बाजारपेठेमध्ये सकाळपासूनच शुकशुकाट दिसत होता. सकाळी सात वाजल्यापासून संपूर्ण शहरात पोलिसांचे पॉईन्ट देण्यात आले होते.
दुपारी अडीच वाजता मोर्चाला सुरवात
दुपारी अडीच वाजता मोर्चाला इदगाह मैदानातून सुरुवात झाली. या मोर्चात सर्वपक्षाचे नेते सहभागी झाले होते. हातात तिरंगी ध्वज घेवून हजारो युवक मोर्चात आले होते. काही जणांच्या हातात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, टिपू सुलतान यांच्या प्रतिमा देखील होत्या. इदगाह मैदान, सरकारी दवाखाना, सुभाष रोड, शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, स्टेशनरोड मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला. या ठिकाणी सर्व पक्षीय नेत्यांची भाषणे झाली.
एसपी ऑफीससमोर रास्ता रोको
मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर शेकडो युवकांनी रस्त्यावर ठाण मांडले. अनेक गाड्या थांबवून रास्ता रोको केला. त्यामुळे काही काळ तणाव पसरला होता.
हेही बघितलेच पाहिजे - Video : ‘या’ जिल्ह्यात सायबर क्राईम विभाग होणार गतिमान
मोर्चा दरम्यान पोलिसांवर दगडफेक, तहसिलदार जखमी
मोर्चा दरम्यान शहरातील पत्रकार भवनसमोर काही मोर्चेकऱ्यंनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. मोर्चेकरी पांगत असताना पुम्हा एकदा पोलिसांवर दगडफेक केली त्यावेळी जमावाला शांत करण्याच्या प्रयत्नात असलेले विद्याचरण कडवकर हे जखमी झाले आहेत. अजूनही शहरात तणावपुर्ण वातावरण आहे.
पाथरीत निषेध मोर्चा
पाथरीत CAA आणि NRC कायदा विरोधी कृती समितीच्या वतीने शुक्रवारी (ता.२०) निषेध मोर्चा काढण्यात आला. शहरातील चौक बाजार येथून निघालेला हा मूक मोर्चा जिल्हा परिषद मैदानपर्यंत काढण्यात आला होता. या मोर्चात हजारो सर्वधर्मीय सर्वपक्षीय नागरिक सहभागी झाले होते. शांततेत निघालेल्या या मोर्चात अनेकांनी आपल्या हातात भाजप सरकारच्या संविधान विरोधी निर्णयाचे निषेध करणारे ‘प्ले कार्ड्स’ धरले होते. मोर्चा विसर्जित करण्यापूर्वी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मोर्चात शहरातील विविध पक्ष, संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.