विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - शालेय विद्यार्थ्यांना शासनाने आधार कार्ड सक्तीचे केले आहे. त्यासाठी महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढणे, बॅंक खाती उघडण्याची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश मुख्याध्यापकांना दिले आहेत. याशिवाय शाळांच्या ठिकाणी आवश्‍यक देखभाल दुरुस्तीची कामे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे शहर अभियंता विभाग व पाणीपुरवठा विभागाला आदेशित केले. 

आयुक्त बकोरिया यांनी शनिवारी (ता. चार) डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात पालिका शाळांचे केंद्रीय मुख्याध्यापक, शहर अभियंता विभाग, पाणीपुरवठा विभाग तसेच वॉर्ड अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली. शासनाने शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना आधार कार्ड सक्तीचे केले आहे. त्याशिवाय खात्यावर शिष्यवृत्ती जमा होणार नाही. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नंबर मिळविण्याची तसेच अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे बॅंकेत खाते उघडण्यासाठी तत्काळ कामाला लागण्याचे आयुक्त बकोरियांनी मुख्याध्यापकांना यावेळी आदेशित केले. 

शहरात पालिकेच्या एकूण 78 शाळा असून, यापैकी बोटांवर मोजण्याइतक्‍या शाळा सोडल्या तर बाकी सर्वच शाळांची अवस्था गंभीर झालेली आहे. काही शाळांच्या भिंती जीर्ण झालेल्यात. संरक्षण भिंती पडल्या असल्याने शाळेच्या संरक्षणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी अडचण होत आहे. या सर्व त्रुटींवर या बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. चर्चेअंती पालिका आयुक्तांनी संबंधित सुविधा व दुरुस्तीची कामे तत्काळ करण्याच्या अनुषंगाने नियोजन करण्याचे शहर अभियंता व पाणीपुरवठा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना आदेशित केले. 

Web Title: student aadhar card