कृषी विद्यापीठात विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील एका विद्यार्थ्याने वसतीगृहातील एका खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता. 12) सकाळी आठ वाजता उघडकीस आली.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रीष्म वसतीगृहातील खोली नंबर 66 मध्ये ही घटना उघडकीस आली आहे. सचिन मुंढे असे या विद्यार्थांचे नाव आहे. तो बुलढाणा जिल्ह्यातील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. दरम्यान, नवामोंढा पोलिसांनी घटनास्थळ भेट दिली असून घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. या विद्यार्थांने आत्महत्या का केली याची माहीती मिळू शकली नाही.

Web Title: a student commit suicide from Vasantrao Naik Agricultural college