BAMU: विद्यार्थी परिषदेची निवडणूक जाहीर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषद निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून, महाविद्यालय आणि विद्यापीठ विभागाचे मतदान 31 ऑगस्टला, तर विद्यापीठ विद्यार्थी परिषदेचे मतदान 23 सप्टेंबरला होणार आहे. विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या चार जिल्ह्यांतील 427 महाविद्यालयांत या निवडणुका होणार आहेत. 

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषद निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून, महाविद्यालय आणि विद्यापीठ विभागाचे मतदान 31 ऑगस्टला, तर विद्यापीठ विद्यार्थी परिषदेचे मतदान 23 सप्टेंबरला होणार आहे. विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या चार जिल्ह्यांतील 427 महाविद्यालयांत या निवडणुका होणार आहेत. 

महाविद्यालय निवडणुकीची अधिसूचना 16 ऑगस्टला, तर विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीची अधिसूचना सहा सप्टेंबरला प्रसिद्ध होणार आहे. विद्यार्थी परिषद निवडणुकीसाठी वर्ष 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांचा पूर्णवेळ अभ्यासक्रमाला 16 ऑगस्टपर्यंत प्रवेश झालेला असणे आवश्‍यक आहे. अधिसूचनेनंतर निवडणूक कार्यालयात अर्ज विक्रीसाठी उपलब्ध होतील. 

महाविद्यालय, विद्यापीठ विद्यार्थी परिषदेसाठी तुकडीनिहाय मतदारयादी प्रसिद्ध करण्यासाठी 19 ऑगस्टला सायंकाळी पाचपर्यंत वेळ आहे. मतदारयादीवर 20 ऑगस्टला तीन वाजेपर्यंत आक्षेप घेता येईल. आक्षेपानंतर त्याच दिवशी पाच वाजता अंतिम मतदारयादी सूचनाफलक, संकेतस्थळावर जाहीर होईल. 22 ऑगस्टला सकाळी 11 ते दुपारी चार वाजेपर्यंत अर्ज दाखल करणे, अर्जाची छाननी 24 ऑगस्टला. अर्जाबाबत आक्षेप 26 ऑगस्टला 11 ते 5 वाजेपर्यंत घेता येईल. 27 ऑगस्टला सायंकाळी पाच वाजेनंतर नामनिर्देशन अर्जाची अंतिम यादी प्रसिद्ध
होईल. अर्ज मागे घेण्यासाठी 28 ऑगस्ट दुपारी चार वाजेपर्यंत मुदत आहे. 
उमेदवारांची अंतिम यादी त्याच दिवशी सायंकाळी पाचनंतर प्रसिद्ध होईल. 31 ऑगस्टला सकाळी 10 ते दुपारी दोनदरम्यान मतदान होणार असून, तीन वाजेनंतर मतमोजणी करून निकाल घोषित केला जाईल; तसेच निवडून आलेल्या अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी, राखीव प्रवर्ग, प्रतिनिधी आणि एनएसएस, क्रीडा, एनसीसी, सांस्कृतिक यातून प्राचार्यांनी नामनिर्देशित केलेल्या सदस्यांची माहिती विहित नमुन्यात विद्यापीठाला ई-मेल आणि हार्डकॉपी तीन सप्टेंबरपूर्वी विद्यापीठात सादर करायवयाच्या आहेत. उमेदवाराने खर्चाचा हिशोब चार ते 18 सप्टेंबरपर्यंत सादर करायचा आहे. 

विद्यापीठ विद्यार्थी  परिषद निवडणूक 
निवडणुकीची अधिसूचना आणि मतदार सहा सप्टेंबरला प्रसिद्ध होईल. यादीवरील आक्षेप नऊ सप्टेंबरला. आक्षेपावर निर्णय आणि अंतिम यादी 11 सप्टेंबरला तर, 12 सप्टेंबरला अर्ज दाखल करता येईल. छाननी आणि नामनिर्देशन अर्जाची यादी 13 सप्टेंबरला प्रसिद्ध होईल. उमेदवारांना 14 सप्टेंबरला आक्षेप घेता येईल. 16 ऑगस्टला आक्षेपावर निर्णय देऊन यादी प्रसिद्ध होईल. अर्ज माघार घेण्यासाठी 18 सप्टेंबरला चार वाजेपर्यंत वेळ आहे. त्यानंतर उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. मतदान 23 सप्टेंबरला तर मतमोजणी आणि निकाल 26 सप्टेंबरला लागणार आहे. एनएसएस, क्रीडा, एनसीसी, सांस्कृतिक सदस्यांचे नामनिर्देशन 28 सप्टेंबरला करावयाचे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Student council election announcement